World Cup India Cricket sakal
Cricket

World Cup India Cricket : वर्ल्डकपसाठी संघ निवड एप्रिलअखेरीस

आयपीएलचा धुमधडाका देशात सुरू झाला आहे आणि स्पर्धा अंतिम टप्प्यात असताना ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारताचा १५ सदस्यांचा संघ जाहीर केला जाईल. १ मे पर्यंत अंतिम खेळाडूंची यादी आयसीसीला कळवायची असल्यामुळे एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात संघ निवड करावी लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आयपीएलचा धुमधडाका देशात सुरू झाला आहे आणि स्पर्धा अंतिम टप्प्यात असताना ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारताचा १५ सदस्यांचा संघ जाहीर केला जाईल. १ मे पर्यंत अंतिम खेळाडूंची यादी आयसीसीला कळवायची असल्यामुळे एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात संघ निवड करावी लागणार आहे. ही ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा वेस्ट इंडीज-अमेरिका येथे संयुक्तपणे होणार आहे. १ मे पर्यंत संघातील खेळाडूंची यादी देण्यात आली तरी त्यात २५ मे पर्यंत बदल करण्याची मुभा असणार आहे.

आयपीएलचा पहिला टप्पा संपत येत असताना एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निवड समितीची बैठक होईल, त्यात संघ निवडला जाईल. आयपीएलमुळे संभाव्य खेळाडूंचा फॉर्म आणि तंदुरुस्तीही तपासता येईल, असे बीसीसाआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. १९ मे रोजी आयपीएलचे अखेरचे साखळी सामना होणार असून अंतिम सामना २६ मे रोजी होणार आहे. भारतीय संघात निवड झालेले काही खेळाडू आयपीएलचे साखळी सामने पूर्ण होताच न्यूयॉर्कला रवाना होतील.

वर्कलोडसाठी सूचना नाही

आंतरराष्ट्रीय सामन्यांतून प्रमुख खेळाडूंवर येणारा ताण लक्षात घेऊन काही जणांना आलटून पालटून विश्रांती दिली जाते; परंतु आयपीएलमध्ये तसे होणार नाही, याचे संकेत मिळत आहे. आयपीएल संघ फ्रँचाईसचे असल्यामुळे बीसीसीआय त्यांना सूचना करू शकत नाही, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dutt: अजय देवगन संजय दत्तचा फॅमिली डॉक्टर? संजय दत्तचे हैराण करणारे खुलासे

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Latest Marathi News Live Updates: इगतपुरी रेल्वे स्थानकावर आदिवासी सेनेचे संस्थापक दि.ना.उघाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT