Tim Southee Catch Sakal
Cricket

NZ vs SL, Test : बॉल आला अन् कॅप्टन साऊदीने झपकन एकाच हाताने पकडला अफलातून कॅच, पाहा Video

Tim Southee One Handed Catch: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात होत असलेल्या पहिल्या कसोटीत टीम साऊदीने एका हाताने अफलातून झेल घेतला.

Pranali Kodre

New Zealand vs Sri Lanka, 1st test: श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघात गॉलमध्ये बुधवारपासून (१८ सप्टेंबर) पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले.

झाले असे की श्रीलंका संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता. यावेळी सलामीला पाथम निसंका आणि दिमुथ करुणारत्ने हे फलंदाजीला उतरले होते. न्यूझीलंडकडून तिसऱ्या षटकात विलियम ओरुर्के गोलंदाजी करत होता.

त्याने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर निसंकाने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या बॅटच्या हँडलच्या जवळ चेंडू लागून मागे गेला. तिथे स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या साऊदीने त्याच्या उजव्या बाजूला सूर मारत उजव्या हाताने अफलातून झेल घेतला.

त्याच्या या झेलाचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. न्यूझीलंडचे खेळाडू चांगले क्षेत्ररक्षक असल्याचे समजले जाते, हेच साऊदीनेही त्याच्या झेलने दाखवून दिले आहे. त्याच्या या झेलमुळे निसंकाला अवघ्या २ धावांवर माघारी परतावे लागले.

तत्पुर्वी श्रीलंकेने पहिल्या डावात ९१.५ षटकात सर्वबाद ३०५ धावा केल्या. त्यांच्याकडून कामिंडू मेंडिसने १७३ चेंडूत ११४ धावांची शतकी खेळी केली. तसेच यष्टीरक्षक फलंदाज कुशल मेंडिसने ५० धावांची खेळी केली.

न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना विलियम ओरुर्केने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तसेच अझाज पटेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर साऊदीने १ विकेट घेतली.

त्यानंतर न्यूझीलंडने ९०.५ षटकात सर्वबाद ३४० धावा केल्या. त्यामुळे त्यांना ३५ धावांची आघाडी मिळाली. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात टॉम लॅथमने १११ चेंडूत ७० धावांची खेळी केली.

तसेच केन विलियम्सने ५५ धावांची आणि डॅरिल मिचेलने ५७ धावांची खेळी केली. तसेच ग्लेन फिलिप्सने ४९ धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून प्रभात जयसुर्याने ४ विकेट्स घेतल्या, तर रमेश मेंडिसने ३ विकेट्स, तर कर्णधार धनंजय डी सिल्वाने २ विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT