Tushar Deshpande Sakal
Cricket

Tushar Deshpande: श्री गुरुवे नमः! तुषार देशपांडेने धोनीसह आयुष्य घडवणाऱ्या 'त्या' गुरूलाही दिल्या शुभेच्छा

Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमेनिमित्त भारतीय क्रिकेटपटू तुषार देशपांडेने इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला आहे.

Pranali Kodre

Tushar Deshpande Instagram Post: रविवारी (२१ जुलै) भारतभरात गुरूपौर्णिमा साजरी केली जात आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरूचे महत्त्वाचे स्थान असते.

गुरू पौर्णिमेच्या दिवशी याच गुरुप्रती आदरही व्यक्त केला जातो. त्यामुळे रविवारी अनेकजण गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेनेही एक खास फोटो शेअर करत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तुषारने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्याच्या वडिलांसह एमएस धोनीचा फोटो शेअर केला आहे. तसेच 'गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः' हा श्लोकही त्याने लिहिला आहे. त्याची ही इंस्टाग्राम स्टोरी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

तुषार आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. त्याला या संघाने २०२२ मध्ये २० लाखांच्या किंमतीत संघात घेतले होते. चेन्नईचा माजी कर्णधार असलेल्या एमएस धोनीने त्याला अनेकदा यादरम्यान मार्गदर्शन केले आहे. तुषारने अनेकदा त्याच्यातील सर्वोत्तम कामगिरी होण्यासाठी धोनीला श्रेय दिले आहे.

त्याने नुकतेच झिम्बाब्वेविरुद्धच्या टी२० मालिकेतून भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने २ सामने खेळले असून २ विकेट्स घेतल्या आहेत. पण त्याला आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवता आलेले नाही.

तुषारने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ३६ सामने खेळले असून ४२ विकेट्स घेतल्या आहेत. यातील ३१ सामन्यात ३९ विकेट्स त्याने चेन्नईकडून खेळताना घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT