Usman Khawaja Marathi News sakal
Cricket

Usman Khawaja : ऑस्ट्रेलियाचा सलामीवर पुन्हा सापडला वादाच्या भोवऱ्यात! चालू कसोटी सामन्यात केलं 'हे' कृत्य

New Zealand vs Australia Test Usman Khawaja News : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे, जिथे पहिला कसोटी सामना वेलिंग्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Kiran Mahanavar

New Zealand vs Australia Test : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे, जिथे पहिला कसोटी सामना वेलिंग्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

यावेळी सलामीवीर उस्मान ख्वाजा त्याच्या बॅटवरून वाद झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वेलिंग्टन कसोटी सामन्यात उस्मान ख्वाजाच्या बॅटला तडा गेला होता. यानंतर त्याने ड्रेसिंग रूममधून दुसरी बॅट मागवली. पण या बॅटवर ब्लॅक डव्ह स्टिकर होते. त्यानंतर त्याला बॅटमधून स्टिकर काढण्याचे आदेश देण्यात आले. ते काढून टाकल्यानंतरच उस्मान ख्वाजाला बॅटिंग करण्याची परवानगी देण्यात आली. उस्मान ख्वाजाने दुसऱ्या डावात 28 धावा केल्या.

उस्मान ख्वाजा यापूर्वीही वादात सापडला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान त्याने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ खास शूज घालण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर आयसीसीने त्याला तसे करण्यापासून रोखले.

खरंतर, पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ उस्मान ख्वाजाला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शूजवर खास संदेश लिहून मैदानात उतरायचे होते, त्यासाठी आयसीसीने त्याला परवानगी दिली नाही. यानंतर तो काळी पट्टी बांधून मैदानात उतरला. त्याचवेळी दुसऱ्या टेस्टमध्ये ख्वाजाला त्याच्या बॅट आणि शूजवर ब्लॅक डव्ह लोगो लावायचा होता. यासाठी त्याला आयसीसीची परवानगीही मिळाली नाही.

मात्र, आयसीसीकडून परवानगी न मिळाल्याने ख्वाजाने दुसरा मार्ग निवडला आणि बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये त्याच्या शूजवर मुलींची नावे आयशा आणि आयला लिहून बॅटिंग करायला आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT