varun chakravarthy marathi news sakal
Cricket

Team India : 'मला दुखापत झाल्याचे सांगून संघातून बाहेर केलं पण...' भारतीय गोलंदाजाच्या वक्तव्यामुळे क्रिकेटविश्वात उडाली खळबळ

भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीबाबत नेहमीच चर्चा होत असते....

Kiran Mahanavar

Varun Chakravarthy On Team India Absence : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीबाबत नेहमीच चर्चा होत असते. टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली ताकद दाखवतात. त्यानंतर संघातून बाहेर झाल्यानंतर निवडकर्त्यावरही जोरदार निशाणा साधला जात आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या शानदार कामगिरीनंतर भारतीय संघात स्थान मिळवणारा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने असा खुलासा केला आहे, ज्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती संघात सामील झाला, आणि जसाच टीम इंडियातून बाहेर पडला. गेल्या तीन वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या या खेळाडूने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणतो की, जेव्हा त्याला संघातून वगळण्यात आले तेव्हा त्याच्याबद्दल जी माहिती समोर आली ती चुकीची होती. संघात स्थान मिळण्यासाठी उपलब्ध असतानाही त्याला दुखापतींचे कारण सांगून संघातून बाहेर केले.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना वरुणने जो खुलासा केला तो खूपच आश्चर्यकारक होता. तो म्हणाला की, मला आठवते की वर्ल्ड कप संपला आणि मला दुखापत झाली. मला झालेली दुखापत फारच किरकोळ होती आणि दोन-तीन आठवड्यांत मी मैदानात परत येऊ शकलो. यानंतरच मला बाजूला केल्या गेले, लोकांनी मला पुन्हा पुन्हा त्याच जुन्या गोष्टी सांगितल्या की तुला दुखापत झाली आहे.

पुढे तो म्हणाला की, पण मला कोणतीही दुखापत झाली नाही. हे का केले गेले ते मला माहित नाही. माझ्या दुखापतीची चुकीची बातमी पसरवली गेली. मला संघाबाहेर ठेवता यावे आणि बाजूला केले जावे यासाठी हे केले गेले. माझ्यासाठी हे खूप कठीण होते कारण मी प्रत्येक देशांतर्गत स्पर्धेत भाग घेत होतो. सगळीकडे जाऊन स्पर्धा खेळत होतो.

शेवटी तो म्हणाला की, मी देशांतर्गत सामन्यांमध्ये भाग घेत होतो. तामिळनाडू प्रीमियर लीगचा एक सामना खेळत होता. मी केवळ खेळत नव्हतो तर तो चांगली कामगिरीही करत होतो. जेव्हा-जेव्हा संघात निवडी होण्याची वेळ आली, तेव्हा मीडियाही मी जखमी झाल्याचा मुद्दा काढायचा. हे कोण करतंय हे मला समजत नव्हतं. लोकांना अजूनही वाटतं की मी जखमी आहे पण तसं अजिबात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! नीट २०२६ परीक्षा रद्द, पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होणार

Gold Crisis Explainer: मोदींच्या ‘सोनं खरेदी टाळा’ आवाहनामागे मोठं संकट? तेल, सोनं, डॉलर आणि रुपयामागचं आर्थिक गणित समोर

Shubhendu Adhikari PA: कोण आहे ठाकूर राज सिंह? शुभेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येप्रकरणी अयोध्येत शूटरला अटक; जाणून घ्या राजकीय कनेक्शन

वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर काय होईल? देशाचे किती लाख कोटी वाचतील? आकडा वाचून थक्क व्हाल

Thalapathy Vijay Support AIADMK : तामिळनाडूत महाराष्ट्रासारखी फूट! आण्णा द्रमुकचे दोन भाग; थलपती विजयला थेट पाठिंबा

SCROLL FOR NEXT