James Anderson Family X/HomeOfCricket
Cricket

James Anderson: शेवटच्या सामन्यात लेकींना लॉर्ड्सवर मिळालेला मोठा मान पाहून अँडरसनचे डोळेही पाणावले, पाहा Video

James Anderson Last Test: जेम्स अँडरसन लॉर्ड्सवर शेवटचा सामना खेळत आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी त्याच्या कुटुंबाला मोठा मान देण्यात आला होता.

Pranali Kodre

England vs West Indies, Lords Test: इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन बुधवारी (१० जुलै) लॉर्ड्स क्रिकेट मैदानात त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी उतरला. इंग्लंडचा बुधवारपासून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे.

दरम्यान, हा सामना खेळण्यासाठी जेव्हा अँडरसन मैदानात उतरला, त्यावेळी दोन्ही संघांकडून आणि प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओवेशन देण्यात आले.

प्रथेप्रमाणे सामना सुरू होण्यापूर्वी लॉर्ड्स मैदानातील प्रतिष्ठीत घंटा वाजवण्यात आली. पण ही घटना अँडरसनसाठी भावनिक ठरली. कारण प्रतिष्ठीत घंटा वाजवण्याचा मान त्याच्या कुटुंबाला बुधवारी देण्यात आला होता. त्याच्या दोन्ही मुलींनी ही घंटा वाजवली. त्यावेळी अँडरसन भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. हा घंटानाद झाल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली.

पहिल्या दिवसाच्या खेळाबद्दल सांगायचं झालं तर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला वेस्ट इंडिज संघ ४१.४ षटकातच १२१ धावांवर सर्वबाद झाला. वेस्ट इंडिजकडून मिकील लुईसने सर्वाधिक २७ धावा केल्या. तसेच ऍलिक अथनाझने २३ आणि कावेम हॉजने २४ धावा केल्या. बाकी कोणी २० धावांचा टप्पाही ओलांडला नाही.

इंग्लंडकडून गस ऍटकिनसनने सर्वाधिक ७ विकेट्स घेण्याचा कारनामा केला. तसेच जेम्स अँडरसन, ख्रिस वोक्स आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

दिग्गज जेम्स अँडरसन

४१ वर्षीय अँडरसन लॉर्ड्सवर त्याची १८८ वा कसोटी सामना खेळत आहे. सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकरनंतर तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच त्याने कसोटीत ७०१ विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटीत ७०० हून अधिक विकेट्स घेणारा एकमेव वेगवान गोलंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT