Rahul Dravid Sakal
Cricket

Rahul Dravid Video Viral: टी20 वर्ल्ड कप जिंकून आलेल्या 'गुरू'ला लहान मुलांकडून गार्ड ऑफ ऑनर; द्रविडनंही जिंकली मनं

Rahul Dravid:राहुल द्रविड टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बंगळुरूला परतला असून त्याला लहान मुलांनी गार्ड ऑफ ऑनर दिल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Rahul Dravid Video Viral: भारतीय क्रिकेट संघाने २९ जून रोजी टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ७ धावांनी पराभूत केले.

या विजयासह भारताने तब्बल १७ वर्षांनी टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले. तसेच हे विजेतेपद भारतीय संघाने राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली जिंकले. भारताला विजेतेपद जिंकून देण्यात द्रविडचेही मोठे योगदान राहिले.

दरम्यान, या विजेतेपदानंतर आता द्रविड घरी परतला आहे. बंगळुरूला घरी गेल्यानंतर त्यांनी एका लहान मुलांच्या क्रिकेट अकादमीला भेट दिली. यावेळी तेथील लहान मुलांनी त्याला बॅट उंचावर गार्ड ऑफ ऑनर दिला.

लहान मुलांनी केलेलं हे स्वागत पाहून द्रविडही भारावला होता. त्यानेही त्या मुलांना नाराज न करता त्यांच्याशी हस्तांदोलन केले. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

रोहितचा तो महत्त्वाचा फोन कॉल

खरंतर द्रविड २०२३ वनडे वर्ल्ड कपनंतर प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणार होता. मात्र, भारताचा कर्णधार रोहित शर्माने त्याला टी२० वर्ल्ड कप २०२४ पर्यंत जबाबदारी कायम करण्यासाठी मनवलं. त्याने द्रविडला त्यासाठी एक फोन कॉल केला होता. हा फोन कॉल महत्त्वाचा होता, याबद्दल द्रविडनेच स्पर्धेनंतर खुलासा केला होता.

भारतीय संघाचं जोरदार स्वागत

दरम्यान, टी२० वर्ल्ड कप जिंकलेला भारतीय संघ ४ जुलै रोजी पहाटे भारतात परतला होता. भारतात आल्यानंतर संघातील खेळाडू आणि राहुल द्रविड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी त्यासर्वांशी संवाद साधला.

यानंतर संपूर्ण भारतीय संघाचा ताफा संध्याकाळी मुंबईत दाखल झाला होता. मुंबईत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लाखोंच्या संख्येने चाहते मरिन ड्राईव्हवर पोहचले होते. त्यानंतर भारतीय संघाचा वानखेडे स्टेडियमवर सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे सोपवलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा हिरवा कंदील

BBM6: या आठवड्यातही डबल एव्हिक्शन! 'हे' दोन स्पर्धक एकाच वेळी घराबाहेर; भाऊच्या धक्क्यावर काय घडलं?

Latest Marathi News Live Update : व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर जळगावची बाजारपेठ गुलाबांच्या फुलांनी सजली

Pune Accident : मध्यरात्री भरधाव ट्रकची कारला भीषण धडक; पुण्यात बाप-लेकीसह मेहुण्याचा जागीच अंत, 'ती' भेट ठरली अखेरची...

SBI Clerk Result 2026: SBI क्लर्क मुख्य परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार; 'या' संकेतस्थळावर पाहा रिजल्ट

SCROLL FOR NEXT