Virat Kohli 12000 runs at Home Sakal
Cricket

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Virat Kohli 12000 runs at Home: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीची दुसऱ्या डावातील विकेट वादग्रस्त ठरली. पण असं असलं तरी त्याने या डावादरम्यान एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

Virat Kohli Record: भारत विरुद्ध बांगलादेश संघात गुरुवारपासून (१९ सप्टेंबर) कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे हा सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

शुक्रवारी या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात विराट कोहली ३७ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. तो पहिल्या डावातही ६ धावांवर बाद झाला होता. विराटला दुसऱ्या डावात मेहदी हसन मिराजने पायचीत केले.

विशेष म्हणजे मेहदी हसन मिराजने २० व्या षटकात टाकलेल्या चेंडूचा हलकासा स्पर्श विराटच्या बॅटला होऊन तो चेंडू त्याच्या पायावर आदळला होता.

मात्र बॅटला झालेला स्पर्श न जाणवल्याने बांगलादेशने केलेल्या अपीलवर अंपायरने त्याला बाद दिले आणि त्यानेही रिव्ह्यु न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला १७ धावांवर माघारी परतावे लागले. परंतु, नंतर रिप्लेमध्ये दिसले की विराटच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाला होता.

दरम्यान, विराटने १७ धावा केल्याने मायदेशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना १२ हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

त्याने भारतात खेळताना २१९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २४३ डावात १२०१२ धावा केल्या आहेत. ज्यात ३८ शतके आणि ५९ अर्धशतके केली आहेत. तो मायदेशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना १२ हजार धावा करणारा जगातील पाचवाच खेळाडू आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस आणि कुमार संगकारा यांनी असा पराक्रम केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मायदेशात सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटर

  • १४१९२ धावा - सचिन तेंडुलकर (३१३ डाव) - भारत

  • १३११७ धावा - रिकी पाँटिंग (३०८ डाव)- ऑस्ट्रेलिया

  • १२३०५ धावा - जॅक कॅलिस (२८२ डाव) - दक्षिण आफ्रिका

  • १२०४३ धावा - कुमार संगकारा (२७० डाव) - श्रीलंका

  • १२०१२ धावा - विराट कोहली (२४३ डाव) - भारत

सामन्यात भारताचे वर्चस्व

चेन्नई कसोटीत भारतीय संघाने पहिल्या डावात ९१.२ षटकात सर्वबाद ३७६ धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव ४७.१ षटकात १४९ धावांवरच संपला. त्यामुळे भारताला २२७ धावांची आघाडी मिळाली होती. भारताने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवस अखेर २३ षटकात ३ बाद ८१ धावा केल्या. त्यामुळे दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे ३०८ धावांची आघाडी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT