Virat Kohli esakal
Cricket

Virat Kohli : विराट कोहलीला कसोटी मालिकेतून ब्रेक घेणं पडलं महागात; झालं मोठं नुकसान!

Virat Kohli ICC Test Batting Ranking : विराट कोहलीने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतून ऐनवेळी माघार घेतली होती. आधी दोन नंतर संपुर्ण कसोटी मालिकेतूनच विराटने माघार घेतली होती.

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli ICC Test Ranking : विराट कोहलीने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्यासाठी त्याने इंग्लंड दौऱ्यातून ब्रेक घेतला होती. दौरा सुरू होण्यापूर्वी विराट कोहली हा भारतीय संघासोबत सराव करत होता. मात्र मालिका सुरू होण्याच्या आधी दोन दिवस त्याने पहिल्या दोन कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. त्यानंर त्याने उर्वरित मालिकेतून देखील माघार घेतली.

मात्र विराट कोहलीला इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका न खेळणे महागात पडले आहे. आयसीसीने नुकतेच कसोटी फलंदाजी रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये विराट कोहलीची दोन स्थानांची घसरण झाली आहे.

आयसीसीने नुकतेच फलंदाजी रँकिंग प्रसिद्ध केली असून विराट कोहली सातव्या स्थानावरून नवव्या स्थानावर घसरला आहे. विराट कोहलीची दोन स्थानांची घसरण झाली आहे. त्याचे 744 रेटिंग पाँईंट्स आहेत.

नुकताच तिसऱ्यांदा बाबा झालेल्या केन विलियम्सनने 893 रेटिंग पाँईट्स मिळवत पहिल्या स्थानावर आहे. तर स्टीव्ह स्मिथ 818 पाँईट्स मिळत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताविरूद्ध चौथ्या कसोटीत शतक ठोकणारा जो रूट 799 रेटिंग पॉईंट्स घेत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

सध्याच्या घडीचे फॅब 4 म्हणून ओळखले जाणारे विराट, स्मिथ, केन अन् रूट यांची सध्याची रँकिंग पाहिली तरी यातील तीन खेळाडू हे पहिल्या तीन स्थानावर आहेत. फक्त विराट कोहलीच नवव्या स्थानावर घसरला आहे.

विराट कोहलीचे स्थान अजून अडचणीत

विराट कोहली हा 7 व्या स्थानावरून 9 व्या स्थानावर घसरला आहे. विराट कोहलीवर आता आयसीसी कसोटी फलंदाजी रँकिंगच्या टॉप 10 मधून बाहेर पडलण्याची नामुष्की ओढवू शकते. जर विराट कोहली इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या कसोटीत खेळला नाही तर तो टॉप 10 मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. टॉप 10 मध्ये दिसणारा सध्याच्या घडीला विराट कोहली हा कसोटी रँकिंगमधील एकमेव भारतीय फलंदाज आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा? बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत,पण...

कंटेनरची दुचाकीला धडक, ३ किमीपर्यंत फरफटत नेलं; आईसह २ चिमुकल्या मुलींचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे

Viral Video: खाकी वर्दीचा दरारा आखाड्यातही! CM योगींच्या बंदोबस्तावरून परतला अन् आव्हान देणाऱ्या मल्लाला केलं चितपट

Marathi News Live Updates: इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान संजय राऊत यांना भोवळ; उन्हाचा त्रास, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी पोलिसांची चर्चा

SCROLL FOR NEXT