Virat Kohli T20 World Cup Team India squad Marathi News sakal
Cricket

Virat Kohli : विराट कोहली T20 World Cup मधून बाहेर? धक्कादायक कारण आले समोर

Virat Kohli T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल याचं रहस्य उलगडलं आहे, पण विराट कोहली 2024 चा टी-20 वर्ल्ड कप खेळणार की नाही हा मोठा प्रश्न आहे.

Kiran Mahanavar

Virat Kohli T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल याचं रहस्य उलगडलं आहे, पण विराट कोहली 2024 चा टी-20 वर्ल्ड कप खेळणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. पण आता विराटबाबत एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये संघात स्थान मिळणार नाही असे सांगण्यात येत आहे. म्हणजेच तो भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला जाणार नाही.

द टेलिग्राफने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, विराट कोहलीची 2024 च्या वर्ल्ड कपसाठी निवड होणार नाही. यावर बीसीसीआय विचार करत आहे. कारण सांगताना सूत्राने सांगितले की, वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या खेळपट्ट्या संथ आहेत आणि अशा खेळपट्ट्या विराट कोहली फिट नाही. याशिवाय भारताचे अनेक युवा खेळाडू या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत असल्याचेही सांगण्यात आले आहे. रिंकू सिंग, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल यांसारखे खेळाडू टी-20 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी होऊ शकतात. बीसीसीआय आता वर्ल्ड कपमध्ये काही युवा खेळाडूंना मैदानात उतरवण्याचा विचार करत आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना ICC टूर्नामेंटमध्ये खेळण्याचा प्रचंड अनुभव आहे. हे दोघे संघात असताना आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात भारताला अपयश आले असले तरी या दोन्ही खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध केले आहे. रोहित शर्माबद्दल जय शाहने आधीच सांगितले आहे की, तो भारतीय संघाचे टी-20 वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व करले.

विराट कोहलीने आतापर्यंत भारतासाठी एकूण 117 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याच्या बॅटमधून 2922 धावा झाल्या आहेत. टी-20 इंटरनॅशनलमध्ये विराटचा स्ट्राईक रेट 138 आहे. त्याच वेळी सरासरी 51 च्या आसपास राहते. विराटने अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आपले एकमेव शतक झळकावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT