Virat Kohli Maybe Will Miss IPL 2024 said Sunil Gavaskar Latest Marathi News sakal
Cricket

Virat Kohli : 'विराट कोहली IPL नाही खेळणार...' दिग्गजाच्या वक्तव्याने उडाली खळबळ; RCBचे चाहते चिंतेत

स्टार फलंदाज विराट कोहली सध्या मैदानाबाहेर आहे... त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला असून तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे पण...

Kiran Mahanavar

Sunil Gavaskar on Virat Kohli : स्टार फलंदाज विराट कोहली सध्या मैदानाबाहेर आहे. त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला असून तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. पण, तो इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मैदानात परतेल, असे मानले जात आहे.

पण, यादरम्यान एक विधान समोर आले आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारताचे माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी कोहलीच्या आयपीएल 2024 मध्ये खेळण्यावर शंका व्यक्त केली आहे. आणि म्हटले आहे की तो कदाचित आयपीएलमध्ये खेळणार नाही...

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या मैदानाबाहेर आहे. इंग्लंडसोबत खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो सहभागी झाला नाही. कारण त्याला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा होता. बीसीसीआयने त्याच्या निर्णयाचा आदर करत त्याला ब्रेक दिला.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, कोहली आयपीएल 2024 मधून मैदानात परतणार आहे. मात्र आता सुनील गावसकर यांनी एक धक्कादायक विधान केल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे.

खरं तर, जेव्हा सुनील गावसकरला विचारले गेले की, कोहली बराच वेळ बाहेर राहिल्यानंतर आयपीएलमध्ये धावा करेल का, तेव्हा माजी भारतीय कर्णधार म्हणाले की, कदाचित तो आयपीएलमध्येही खेळणार नाही.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना एक मुलगा झाला आहे. 15 फेब्रुवारीला अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला. अनुष्का आणि विराट कोहली या दोघांनीही पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. आता तो 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग 2024 सह मैदानात परततो की नाही हे पाहणे बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT