Virender Sehwag Son Aryavir Sakal
Cricket

Virender Sehwag Son: भले शाब्बास! सेहवागच्या लेकाने गाजवला पदार्पणाचा सामना, दिल्लीला मिळवून दिला शानदार विजय

Virender Sehwag Son Aryavir Shines in Debut Match for U19 Delhi: विरेंद्र सेहवागचा मुलगी आर्यवीरने १९ वर्षांखालील दिल्ली संघाकडून पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे.

Pranali Kodre

Vinoo Mankad Trophy 2024: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग यांनी एक काळ गाजवला आहे. आता त्यांची पुढची पिढी क्रिकेट खेळताना दिसत आहे. सचिनचा मुलगा अर्जुन आणि द्रविडचा मुलगा समित यांचे वरिष्ठ स्तरावर क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे.

आता सेहवागचा मुलगाही आर्यवीरही क्रिकेट खेळताना दिसत आहे. त्याने १९ वर्षांखालील दिल्लीकडून नुकतेच पदार्पण केले आहे. तो भारताची १९ वर्षांखालील देशांतर्गत स्पर्धा विनू मंकड ट्रॉफी स्पर्धेत दिल्लीकडून खेळत आहे.

त्याने पहिल्याच सामन्यात दिल्लीला मणीपुर विरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात मणीपुरने दिल्लीसमोर विजयासाठी ५० षटकात १६९ धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आर्यवीर आणि सार्थक राय हे सलामीला फलंदाजीसाठी उतरले. त्यांनी सुरुवात चांगली केली. सार्थकने आक्रमक खेळ केला. पण तो १७ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. त्यापाठोपाठ आदित्य कुमारही ८ धावांवर बाद झाला. पण आर्यवीरला नंतर कर्णधार प्रणव पंतने चांगली साथ दिली.

या दोघांनी अर्धशतकी भागीदारीही केली. पण आर्यवीरला अर्धशतकासाठी केवळ १ धावेची गरज असताना दानिशने बाद केले. त्यामुळे आर्यवीरला ६४ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ४९ धावा करून माघारी परतावे लागले.

त्यानंतर आदित्य भंडारीही १ धावेवर बाद झाला. पण प्रणवने ४५ चेंडूत नाबाद ७५ धावा करत दिल्लीला २६ षटकातच विजय मिळवून दिला. दिल्लीने २६ षटकात ४ बाद १७१ धावा केल्या. मणीपूरकडून सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी मणीपूरने प्रथम फलंदाजी करताना ४९.१ षटकात सर्वबाद १६८ धावा केल्या होत्या. मणीपूरकडून अलीकरिमने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद अकिल अहमदने ४५ धावांची खेळी केली. याशिवाय कोणाला खास काही करता आले नाही.

दिल्लीकडून लक्ष्मणने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल़्या, तसेच दिवांश रावत आणि अमन चौधरी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. प्रणव पंत आणि सक्षम गाहलोत यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT