VVS Laxman X/BCCI
Cricket

लक्ष्मण परतणार IPL मध्ये, 'या' संघानं साधला संपर्क; पण NCA प्रमुखाची जागा घेणार कोण?

VVS Laxman: सध्या एनसीएचा प्रमुख असलेला व्हीव्हीएस लक्ष्मण लवकरच आयपीएलमध्ये परतण्याची शक्यता आहे. त्याच्याशी आयपीएल संघांनी संपर्क केल्याचेही समोर आले आहे.

Pranali Kodre

VVS Laxman May Return in IPL: भारतीय क्रिकेट संघाचे कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल झाला आहे. आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या मुख्य पदांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. सध्या बंगळुरू येथे असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण काम पाहात आहे. पण त्याचाही कार्यकाळ लवकरच संपणार आहे.

मिडिया रिपोर्ट्सनुसार लक्ष्मण ही जबाबदारी पुढे कायम करु इच्छित नाही. त्याने राहुल द्रविडच्या जागेवर २०२१ ला ही जबाबदारी खांद्यावर घेतली होती. पण आता त्याला कार्यकाळ सप्टेंबर २०२४ मध्ये संपणार आहे.

यादरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार व्हीव्हीएस लक्ष्मण आयपीएलमध्ये परतू शकतो. लखनौ सुपर जायंट्सने लक्ष्मणची संपर्क साधला असल्याचेही समजत आहे. त्याला २०२५ मध्ये कोचिंग टीमचा भाग म्हणून सामील करण्यासाठी त्याला संपर्क साधण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

लखनौ संघाचे सध्या मुख्य प्रशिक्षकपद जस्टिन लँगर यांच्याकडे आहे. तसेच लान्स क्लुजनर सहाय्यक प्रशिक्षक असून मॉर्ने मॉर्केल गोलंदाजी प्रशिक्षक आहे. त्याचबरोबर जॉन्टी ऱ्होड्स क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आहे.

लखनौव्यतिरिक्त अन्य काही आयपीएल फ्रँचाझींनीही त्याच्याशी संपर्क साधल्याचे समजत आहे.

लक्ष्मणने यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघासह २०१३ ते २०२१ मेंटॉर म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्याला आयपीएलचा चांगला अनुभव आहे. यामुळे तो पुन्हा एकदा आयपीएलमध्ये येण्याचा विचार करू शकतो.

दरम्यान, लक्ष्मणने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखाचे पद पुढे कायम केले नाही, तर या पदावर नव्या व्यक्तीला नियुक्त करावे लागणार आहे. यासाठी माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचे नाव आघाडीवर आहे.

टी२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड हे बराच काळापासून भारतीय क्रिकेटमध्ये काम करत असल्याने ते हे पद स्विकारण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी २०१९ ते २०२४ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: अ‍ॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यास ‘बीसीआय’ची स्थगिती; आदेशात नेमकं काय म्हटलं?

Mangalwedha News : नगराध्यक्षपदाच्या तीन अर्जासह नगरसेवकाच्या दोन अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना प्रतीक्षा

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT