Rinku Singh | India vs Zimbabwe Sakal
Cricket

IND vs ZIM: लक्ष्मणने रिंकु सिंगला दिलं 'फिल्डिंग मेडल' अन् खेळाडूंना त्याला केलं स्टूलवर उभं, Video एकदा पाहाच

India Fielding Medal: झिम्बाब्वेविरुद्धच्या टी२० मालिकेनंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये रिंकु सिंगला फिल्डिंग मेडल देण्यात आलं, त्यावेळी खेळाडूंमध्ये मस्तीचे वातावरण दिसून आलं.

Pranali Kodre

India vs Zimbabwe T20I Series: भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ४-१ अशा फरकाने विजय मिळवला. ही मालिका रविवारी (१४ जुलै) संपली. यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये मालिकेती सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला मेडल देण्यात आले.

खरंतर गेल्या वर्षापासून भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये फिल्डिंग मेडल देण्याची प्रथा माजी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी सुरू केली आहे. हीच प्रथा झिम्बाब्वेविरुद्धच्या टी२० मालिकेतही पाळण्यात आली.

या मालिकेनंतर भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये झिम्बाब्वेदौऱ्यासाठी प्रभारी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक राहिलेल्या शुभदीप घोष यांनी रिंकु सिंगला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून घोषित केले. यावेळी त्यांनी टी दिलीप यांचा खास मेसेज शेअर केला.

टी दिलीप यांनी सांगितले की क्षेत्ररक्षण महत्त्वाचा भाग असून जो खेळाडू त्याच्या क्षेत्ररक्षणाने सामन्यात मोठा प्रभाव पाडतो, त्याला हे मेडल दिले जाते.

त्यानंतर शुभदीप घोष यांनी प्रभारी मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मणला हे मेडल रिंकुला देण्यास सांगितले. रिंकुने मेडल स्विकारल्यानंतर अन्य खेळाडूंनी मोठा जल्लोष केला. यावेळी रवी बिश्नोईने त्याला स्टुलवर उभं राहुन त्याचं भाषण करण्यास सांगितलं. पहिले रिंकु यासाठी तयार नव्हता, पण संघसकाऱ्यांनी मस्ती करत आग्रह केल्यानंतर तो स्टुलवर उभा राहिला.

रिंकु म्हणाला,'सर्वकाही ईश्वराच्या इच्छेने होत आहे. सर्व सामने खेळून चांगलं वाटलं. ही माझी चौथी किंवा पाचवी मालिका असेल, त्यामुळे चांगले वाटत आहे. मला फलंदाजीपेक्षाही क्षेत्ररक्षण जास्त आवडते. मला क्षेत्ररक्षण करताना मजा येते. मला धावतानाही आनंद मिळतो, जर मी पळालो नाही, तर माझं शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटतं.'

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान मालिकेबद्दल सांगायचे झाले, तर भारताने पहिला सामना 13 धावांनी पराभूत झाला होता. पण त्यानंतर चारही सामने भारताने जिंकले. भारताने दुसरा सामना १०० धावांनी, तिसरा सामना २३ धावांनी, चौथा सामना १० विकेट्सने आणि पाचवा सामना ४२ धावांनी जिंकला.

या मालिकेनंतर भारताला आता श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळले जाणार आहे. या दौऱ्यातील सामन्यांना २७ जुलैपासून सुरुवात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT