Wasim Akram esakal
Cricket

Wasim Akram : इथं आहेत ती सांभाळता येत नाहीत... धरमशाला स्टेडियमवरून अक्रमने PCB ची लायकीच काढली

अनिरुद्ध संकपाळ

Wasim Akram Dharamshala Stadium : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार वसिम अक्रम आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत असतो. आता वसिम अक्रमने भारताचे सर्वात सुंदर स्टेडियम धरमशाला स्टेडियमवरून पीसीबीला एकप्रकारे चिमटा काढला आहे. वसिम अक्रमला पाकिस्तानात असं स्टेडियम उभारलं जाऊ शकतं का असं विचारलं त्यावर त्याने स्पष्टपणे उत्तर देत पीसीबीची लायकीच काढली.

भारतातील स्टेडियमची तुलना केल्यावर वसिम अक्रम म्हणाला की, 'पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या आहे त्या स्टेडियमची देखभाल नीट करू शकत नाही आणि आपण भारताशी तुलना करत आहोत. एका स्पोर्ट्स चॅनलशी बोलताना वसिम अक्रमला फॅनने भारताच्या धरमशाला आणि न्यूझीलंडच्या क्विन्सटाऊन सारखे स्टेडियम आपल्या उत्तरी पाकिस्तानात का होत नाहीत.

यावर अक्रम म्हणाला की, लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमच्या छताची हालत पाहिला का किती खराब झालं आहे. या स्टेडियमची देखरेख आपण करू शकत नाही नवीन स्टेडियम उभारणे तर दूरची गोष्ट.

अक्रम पुढे म्हणाला की, आपण नवे स्टेडियम तयार करण्याचं फक्त स्वप्न पाहू शकतो. आपल्याकडे नवे स्टेडियम तयार करण्याची जागा देखील आहे. मात्र आधीपासून असलेल्या स्टेडियमची आपण देखभाल करू शकत नाही. अनेक वर्षे पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन झाले नव्हते. त्यामुळे पीसीबीची आर्थिक स्थिती खराब झाली आहे.

पीसीबीची आर्थिक स्थिती खूप खराब झाली असल्याने त्याच्या स्टेडियमचे देखील अवस्था बिकट आहे. गेल्या काही काळापासून पाकिस्तानात सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत थोडी सुधारणा झाली आहे. त्यामुळे देशातील स्टेडियमची स्थिती देखील सुधारत आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT