ajinkya rahane one day cup 2024 sakal
Cricket

शाब्बास अज्जू! इंग्लंडमध्ये Ajinkya Rahane चा डंका; पहिल्याच मॅचमध्ये धडाकेबाज खेळी, Video

Ajinkya Rahane special inning - भारतीय संघाबाहेर असलेला मुंबईचा अजिंक्य रहाणे इंग्लंडचे मैदान गाजवतोय. काल त्याने तेथील वन डे चषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दमदार खेळी केली.

Swadesh Ghanekar

Ajinkya Rahane One Day Cup 2024 : भारतीय संघात पुनरागमनासाठी प्रयत्नशील असलेला अजिंक्य रहाणे इंग्लंडमध्ये तुफान फटकेबाजी करताना दिसतोय. त्याच्या झंझावाती खेळीच्या जोरावर Leicestershire संघाने वन डे चषक स्पर्धेतील ब गटाच्या सामन्यात ३६९ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या नॉटिंगहॅमशायरला ८९ धावांवर रोखले. रहाणेने लीसेस्टरशायरकडून पदार्पणाच्या सामन्यात ६० चेंडूंत ९ चौकारांसह ७१ धावांची शानदार खेळी केली.

अजिंक्यच्या खेळीच्या जोरावर लीसेस्टरशायरने ५० षटकांत ६ बाद ३६९ धावा केल्या. सॉल बुडिंगरने ७५ आणि कर्णधार लुईस हिलने ८१ धावांची खेळी केली. लीसेस्टरशायरने नॉटिंगहॅमशायर संघासमोर ३७० धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु पावसाचा व्यत्यय आल्याने डकवर्थ लुईसच्या आधारे नॉटिंगहॅमशायरला १४ षटकांत १०५ धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. पण, नॉटिंगहॅमशायरला६ बाद ८९ धावाच करता आल्या.

अजिंक्य रहाणे सुमारे वर्षभरापूर्वी भारतीय संघाच्या जर्सीत दिसला होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळला होता, त्यानंतर तो संघाबाहेर आहे. तो आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता, परंतु त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर तो इंग्लंडमध्ये लीसेस्टरशायरकडून खेळण्यासाठी गेला.

अजिंक्य रहाणे आगामी काळात देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहे.२०१८ मध्ये त्याने भारताकडून शेवटचा वन डे सामना आणि २०१६ मध्ये ट्वेंटी-२० सामना खेळला होता. रहाणेच्या नावावर भारतासाठी ८५ कसोटी सामन्यांमध्ये १२ शतके आणि २६ अर्धशतकांसह एकूण ५०७७ धावा आहेत. ९० वन डे सामन्यांमध्ये त्याने तीन शतके आणि २४ अर्धशतकांसह २९६२ धावा केल्या आहेत. रहाणेने भारतासाठी २० ट्वेंटी-२० सामनेही खेळले, ज्यामध्ये त्याने एका अर्धशतकासह ३७५ धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 : पाकिस्तानी वंशांच्या क्रिकेटपटूला T20 World Cup साठी भारताने व्हिसा नाकारला; सोशल मीडियावर लिहितो की...

Belly Fat Reduction: पोटाची चरबी कमी करायची आहे? हार्वर्ड डॉक्टरांकडून जाणून घ्या डाएटचं बेस्ट फॉर्मुला

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर: दहशतवादी संबंधांच्या आरोपाखाली 5 सरकारी कर्मचारी निलंबित

Pandharpur Politics : 'आमदार आवताडेंनी पंढरपुरात भाजपचे सहा उमेदवार पाडले'; पराभूत महिला उमेदवाराच्या पतीचा गंभीर आरोप, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Shiv Thakare: अखेर त्या अफवा खोट्या ठरल्या; शिव ठाकरेने सांगितलं 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

SCROLL FOR NEXT