Virat Kohli  Sakal
Cricket

Virat Kohli: विराटने टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलामीला फलंदाजी करावी की तिसऱ्या क्रमांकावर? माजी क्रिकेटपटूंच काय मत

Virat Kohli: विराटने आगामी टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करावी, यावर अनेक माजी खेळाडूंमध्ये मतमतांतरे पाहायला मिळत आहेत.

Pranali Kodre

Virat Kohli News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेत स्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीची चर्चाही होत आहे.

याचदरम्यान, विराटने आता आगामी टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करावी, यावर अनेक माजी खेळाडूंमध्ये मतमतांतरे पाहायला मिळत आहेत.

आयपीएल 2024 च्या सुरुवातीला विराटला टी20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळावी की नाही, तसेच त्याच्या स्ट्राईक रेटबद्दलही बरीच चर्चा झाली. मात्र, विराटने त्याच्या फलंदाजीने त्याच्या टिकाकारांना उत्तर दिले. त्याच्या कामगिरीमुळे त्याला वर्ल्ड कपसाठीही भारतीय संघात निवडण्यात आले. यानंतर आता त्याच्या फलंदाजी क्रमांकाबाबत चर्चा होत आहेत.

अद्यापतरी तो सलामीला फलंदाजी करणार की तिसऱ्या क्रमांकावर की मधल्या फळीत फलंदाजीला येणार याबाबत भारतीय संघातील कोणाकडूनही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

तथापि, अनेक माजी क्रिकेटपटूंनी याबाबत वेगवेगळी मतं मांडली असून भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे की विराटने सलामीला फलंदाजी करावी.

त्याच्या या मताला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने समर्थन दिले आहे. अराउंड द विकेट पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने याबाबत मत मांडले आहे.

पेन म्हणाला, 'मला वाटते विराटने सलामीला फलंदाजी करावी. विराटने त्याला हव्या त्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा प्रतिष्ठा मिळवली आहे, विशेषत:तो आत्ता ज्या शानदार फॉर्ममध्ये आहे त्यानंतर. जर मी संघव्यवस्थापनाचा भाग असतो, तर मी माध्या सर्वोत्तम फलंदाजाने जास्तीत जास्त चेंडू खेळावेत, असा विचार केला असता.'

'विराट अनुभवी खेळाडू आहे आणि मला आवडेल की त्याने वरती येऊन जास्तीत जास्त चेंडू खेळावेत. जेव्हा त्याच्यासारखा दर्जेदार खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये असतो, तेव्हा त्याचा प्रभाव सामन्यावर पडावा, असेच तुम्हाला वाटते.'

मात्र दुसरीकडे सुरेश रैनाने म्हटले आहे की विराटने तिसऱ्या क्रमांकावरच खेळणे कायम करावे. त्याच्याप्रमाणेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍरॉन फिंचनेही तिसऱ्या क्रमांकावर विराटने खेळल्यान भारताच्या डावाला स्थिरता मिळू शकते असं म्हटलं आहे.

फिंच म्हणाला, 'आयपीएल स्पर्धेच्या आधी, त्याला वर्ल्ड कप संघात संधी मिळेल का, अशी चर्चा होती. पण हे बाजूला सरकवत त्याने त्याची जबाबदारी चोख बजावली, त्याने 155च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली, जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे.'

'त्यामुळे ही गोष्ट खूप चांगली आहे. मला त्याला तिसऱ्या क्रमांकावरच ठेवायला आवडेल. त्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळल्याने जी स्थिरता मिळते, त्यामुळे इतरांना त्यांचा नैसर्गिक खेळ खेळता येईल.'

याशिवाय फिंचने असेही म्हटले की रोहित शर्मासह यशस्वी जैस्वालने सलामीला फलंदाजी करावी.

तो म्हणाला, 'तुमच्याकडे जैस्वाल आहे, जो चौफेर फटकेबाजी करू शकतो. तो चांगली सुरुवात देऊ शकतो. मला खात्री नाही की वेस्ट इंडिजमध्ये गरजेचा असलेला तो प्रभाव निर्माण करू शकतात.'

दरम्यान, टी20 वर्ल्ड कप 1 जून ते 29 जून दरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणार आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध 5 जून रोजी खेळवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT