Akash Deep
Akash Deep esakal
क्रिकेट

Akash Deep : 13 व्या वर्षी वडील अन् भावाला गमावलं; स्ट्रेच फ्रॅक्चरमधून सावरत कसोटी पदार्पण करणाऱ्या आकाश दीपची झुंजार स्टोरी

अनिरुद्ध संकपाळ

Who Is Akash Deep What Is his story : जसप्रीत बुमराहने चौथ्या कसोटीतून माघार घेतल्यानंतर भारतीय संघात बिहारच्या आकाश दीपचा समावेश करण्यात आला. चौथ्या कसोटीत त्याला पदार्पणाची संधी देखील मिळाली. त्याने आपल्या या पदार्पणाच्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्याने झॅक क्राऊली, बेन डकेट आणि ओली पोप यांना बाद करत दणक्यात पदार्पण साजरं केलं.

मुळचा बिहारचा असलेला मात्र बंगालकडून खेळावं लागलेल्या आकाश दीपची स्टोरी जबरदस्त आहे. आकाश दीपने वयाच्या 22 व्या वर्षी 2019 मध्ये बंगालकडून प्रथम श्रेणी पदार्पण केलं होते. त्याने भारताकडून पदार्पण करण्यापर्यंत त्याने 30 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले असून त्यात 23.58 च्या सरासरीने 104 विकेट्स घेतल्या आहेत.

आकाश दीप आयपीएलमध्ये आरसीबकडून देखील खेळला असून गेल्या दोन हंगामात तो फ्रेंचायजीकडून 7 सामने खेळला आहे. आरसीबीने 2024 च्या हंगामासाठी त्याला रिटेन केलं आहे.

आकाश दीप हा मुळचा बिहारचा असून ज्या भागात त्याचा जन्म झाला त्या भागाचा 2004 ते 2018 पर्यंत रणजी ट्रॉफीचा संघ देखील नव्हता. याचबरोबर आकाश दीप अवघ्या 13 वर्षाचा असताना त्याला दुहेरी कौटुंबिक धक्का बसला होता. 2010 मध्ये त्याचे वडील आणि मोठा भाऊ यांचे निधन झाले. त्यानंतर आकाश दीप हा क्रिकेट खेळण्यासाठी दिल्लीत गेला तेथून पुढे तो कोलकात्यात आला.

आकाश दीप व्यावसायिक क्रिकेट खेळू लागला होता तेवढ्यात त्याला अजून एक मोठा धक्का बसला. त्याला स्ट्रेस फ्रॅक्चरची दुखापत झाली. त्यावेळी तो बंगालच्या 23 वर्षाखालील संघात निवडला गेला होता. त्याला दुखापतीतून सावरत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी 2019 मध्ये मिळाली.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर आकाश दीपने मागे वळून पाहिले नाही. त्याने 2019-20 च्या रणजी हंगामात 35 विकेट्स घेतल्या. मात्र 2020-21 मध्ये रणजी हंगामच झाला नाही. त्यामुळे 2021-22 च्या हंगामात त्याची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही. मात्र 2022-23 च्या हंगामात बंगालने पुन्हा एकदा उपविजेतेपद पटकावलं. दीपने या हंगामात 40 विकेट्स घेतल्या अन् स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.

त्यानंतर आकाश दीपला भारतीय अ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याने दक्षिण आफ्रिका अ संघ विरूद्ध पदार्पण केलं. त्यानंतर 2024 मध्ये इंग्लंड लायन्स संघाविरूद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची पुन्हा भारतीय अ संघात निवड झाली. या मालिकेत आकाश दीपने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. दोन सामन्यात त्याने 11 विकेट्स घेतल्या.

यानंतर मोहम्मद शमीची दुखापत अन् मुकेश कुमारची खराब कामगिरी यामुळे आकाश दीपला भारतीय संघात स्थान मिळालं. त्याला रांची कसोटीत कसोटी पदार्पण करण्याची देखील संधी मिळाली अन् त्या संधीचं त्यानं सोनं केलं.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT