Who is Sobhana Asha RCB beat UP Warriorz Marathi News sakal
Cricket

WPL 2024: कोण आहे शोभना आशा? 5 विकेट्स घेत रचला इतिहास, रोमहर्षक सामन्यात RCBचा दोन धावांनी विजय

Asha RCB beat UP Warriorz by 2 runs News : दुसऱ्या सामन्यात आरसीबीने यूपी वॉरियर्सचा दोन धावांनी पराभव केला.

Kiran Mahanavar

Who is Sobhana Asha : महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2024) शनिवारी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यात उत्साह शिगेला पोहोचला होता. दुसऱ्या सामन्यात आरसीबीने यूपी वॉरियर्सचा दोन धावांनी पराभव केला.

शोभना ही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघासाठी आशेचा किरण ठरली. या सामन्यात तिने पाच विकेट घेतल्या. यासह ती डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रात पाच बळी घेणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली. 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपीचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 155 धावा करू शकला.

कोण आहेत शोभना आशा?

01 जानेवारी 1991 रोजी केरळमधील त्रिवेंद्रम येथे आशा शोभनाचा जन्म झाला. तिचे वडील ऑटो ड्रायव्हर होते, पण त्यांनी आपल्या मुलीच्या क्रिकेटर होण्याच्या मार्गात आर्थिक अडचण येऊ दिली नाही. शोभना इंडिया ए वुमन, इंडियन बोर्ड प्रेसिडेंट्स वुमन इलेव्हन, केरळ आणि पुद्दुचेरी तसेच रेल्वेकडून खेळली आहे.

शोभना आशाला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने WPL च्या पहिल्या हंगामात 10 लाख रुपयांना संघात घेतले होते. शोभनाच्या रूपाने आरसीबीला एक उत्तम गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

गेल्या वर्षी आरसीबीकडून खेळताना त्याने 5 सामन्यात 5 बळी घेतले होते. तिला बहुतांश सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण आता शोभनाने पहिल्याच सामन्यात 5 बळी घेत इतिहास रचला आहे.

शोभनाने एका षटकात 3 विकेट घेत सामचा फिरवला. 17व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर श्वेता शेरावत, चौथ्या चेंडूवर ग्रेस हॅरिस आणि सहाव्या चेंडूवर किरण नवगिरेला बाद करून तिने सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर खिशात टाकला.

खरंतर, यूपी वॉरियर्स 17 व्या ओव्हरपूर्वी सामन्यात होती. 16व्या षटकापर्यंत 3 गडी गमावून 126 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत 4 षटकात विजयासाठी 32 धावांची गरज होती. युपी वॉरियर्स हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण शोभनाच्या घातक गोलंदाजीसमोर यूपी वॉरियर्स संघाची घसरण सुरू झाली. आरसीबीने शेवटच्या षटकात हा सामना 2 धावांनी जिंकला.

या 5 विकेट्ससह शोभना आशा WPL मध्ये 5 बळी घेणारी जगातील चौथी गोलंदाज ठरली आहे. सर्वात आधी अमेरिकेच्या तारा नॉरिसने गेल्या वर्षी 5 विकेट घेत इतिहास रचला होता. डब्ल्यूपीएलमध्ये 5 विकेट घेणारी ती पहिली गोलंदाज होती. यासोबतच गेल्या वर्षी गुजरातच्या मॅरिझान कॅपने 15 धावांत 5 बळी घेतले होते. तर किम गर्थने 36 धावांत 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. आता या यादीत शोभना आशा यांचे नाव जोडले गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shivajinagar Court Gangwar History : ४२ वर्षांपूर्वीही शिवाजीनगर कोर्टाबाहेर झाला होता 'असाच' रक्तरंजित थरार! माळवदकर टोळीने घेतला होता बाळू आंदेकरचा बळी; वाचा पुण्यातील टोळीयुद्धाचा इतिहास

NIC Portal Issue : एनआयसी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदत जमा होण्यास सुरुवात

Viral Video: 'स्टॅन स्टॅन' बनून रिषभ पंतचा धमाका! न्यूझीलंडमध्ये स्थानिक क्लबसाठी सिक्सचा पाऊस पाडत केलं अर्धशतक

Latest Marathi News Live Update: टिंगरे नगर रोडवरील अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा

Pune Crime : रस्त्यावरील किरकोळ वादातून तरुणाचा खून; आठ जणांना जन्मठेप

SCROLL FOR NEXT