Who is the captain of Team India for Sri Lanka tour sakal
Cricket

India Squads for Sri Lanka Series : जागा 1, दावेदार 3.... श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार कोण? जाणून घ्या गंभीरची पहिली पसंती...

India Squads for Sri Lanka Series : भारत-श्रीलंका यांच्यामध्ये २७ जुलै ते ७ ऑगस्ट यादरम्यान तीन टी-२० व तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे.

Kiran Mahanavar

Who is the captain of Team India for Sri Lanka tour : भारत-श्रीलंका यांच्यामध्ये २७ जुलै ते ७ ऑगस्ट यादरम्यान तीन टी-२० व तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड अद्याप करण्यात आलेली नाही. हार्दिक पंड्याकडे भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व असेल, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली असून याचसह वैयक्तिक कारणामुळे हार्दिक याने एकदिवसीय मालिकेमधून माघार घेतल्याचेही सांगण्यात आले.

आता हार्दिकच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे कर्णधारपद कोणाकडे असेल, असा प्रश्‍न याप्रसंगी निर्माण झाला आहे. शुभमन गिल, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव यांची नावे शर्यतीत आहेत.

बीसीसीआयच्या सूत्रांकडून पुढे सांगण्यात आले की, भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करीत असताना हार्दिक पंड्याकडे उपकर्णधारपद होते. त्यामुळे श्रीलंकन संघाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याच्याकडेच भारतीय संघाचे नेतृत्व असणार आहे; मात्र श्रीलंकन संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून हार्दिकने माघार घेतली आहे. त्याच्याकडून वैयक्तिक कारण सांगण्यात आले आहे. त्याची तंदुरुस्ती उत्तम आहे.

गंभीर-राहुल जोडीचा अनुभव

लखनौ सुपरजायंटस्‌ या संघाचा आयपीएलमध्ये समावेश आहे. कोलकता नाईट रायडर्स संघाचे मेंटॉर होण्याआधी भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक गौतम गंभीर हे लखनौ संघाचे प्रशिक्षक होते. तसेच के. एल. राहुल कर्णधार म्हणून कार्यरत होता. दोघांच्या कल्पकतेमुळे लखनौ संघाने प्ले ऑफपर्यंत मजल मारती होती. दोघेही एकमेकांना चांगले ओळखत असल्यामुळे एकदिवसीय मालिकेसाठी गंभीर यांच्याकडून राहुलच्या नावाला पसंती देण्यात येऊ शकते.

इतरांना संधी?

शुभमन गिल याने नुकत्याच पार पडलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेविरुद्ध भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व केले. त्याच्याकडे भारतीय संघाचे भविष्य म्हणून बघितले जात आहे. त्यामुळे त्याच्याकडेही नेतृत्व सोपवण्यात येऊ शकते. सूर्यकुमार यादव व रिषभ पंत यांच्या खांद्यावरही भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यास आश्‍चर्य वाटणार नाही.

रोहित, विराट, बुमराची विश्रांती?

गौतम गंभीर यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ खेळाडूंनी घेतलेल्या विश्रांतीबद्दल टीका केली होती. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा हे वरिष्ठ खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळतील का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे; पण भारतीय संघ आगामी काळात दहा कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या तंदुरुस्तीचा कस लागणार आहे. याच कारणामुळे वरिष्ठ खेळाडूंना श्रीलंकन संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी शक्यता आहे.

श्रेयस अय्यरचे पुनरागमनाची शक्यता

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत ठसा उमटवणारे अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर व ॠतुराज गायकवाड या खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. याचसह केंद्रीय करारातून वगळण्यात आलेल्या श्रेयस अय्यरचेही टीम इंडियामध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा हजारो वाहनांसह ताफा मुंबईकडे रवाना

Ravichandran Ashwin IPL Retirement : रविचंद्रन अश्विनचा IPL ला देखील रामराम! 8 महिन्यात घेतला दुसरा मोठा निर्णय

Lasalgaon News : श्रीलंकेने कांद्यावरील आयात शुल्क वाढवले; भारतीय कांदा निर्यातदारांना फटका

Pune News : पुण्यात गणेशोत्सव काळात मद्यविक्रीस बंदी; कायदा सुव्यवस्थेसाठी निर्णय

Ganpatipule Travel: गणेशोत्सवात गणपतीपुळेच्या दर्शनासाठी जाताय? या जवळच्या ठिकाणांना देखील भेट द्या!

SCROLL FOR NEXT