Ind Vs Eng Rajat Patidar Marathi News sakal
Cricket

Ind vs Eng : खराब फॉर्म असूनही रजत पाटीदारला BCCI संघातून नाही करणार बाहेर? जाणून घ्या कारण

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना पाच गडी राखून जिंकला. टीम इंडियासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.

Kiran Mahanavar

India vs England 5th Test : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना पाच गडी राखून जिंकला. टीम इंडियासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. भारतीय संघाकडून ध्रुव जुरेलने दोन्ही डावात दमदार कामगिरी केली. त्याच्या चमकदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. चौथा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे.

यामालिकेआधी माजी कर्णधार विराट कोहलीने मालिकतून नाव मागे घेतले होते. त्याच्या जागी भारताचा स्टार खेळाडू रजत पाटीदारला संघात स्थान मिळाले. विशाखापट्टणम कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या रजत पाटीदारला राजकोट आणि रांचीमध्येही संधी मिळाली, मात्र त्याला 6 डावात एकदाही मोठी खेळता आली नाही. खराब फॉर्ममुळे रजत पाटीदारला भारताच्या कसोटी संघातून वगळले जाणे निश्चित होते. मात्र, रजत पाटीदारला अद्याप बाहेर केले नाही.

कारकिर्दीतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये रजत पाटीदारने ज्या प्रकारचा फॉर्म दाखवला त्यावरून रांचीमध्येच त्याचा पत्ताकट होणार हे स्पष्ट झाले होते. पण केएल राहुल तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला आणखी एक संधी मिळाली. तिथेही तो फ्लॉप ठरला. आता 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यातूनही त्याचा पत्ता कट होणार नाही. कारण केएल राहुल अद्याप दुखापतीमधून सावरलेला नाही.

बीसीसीआयने त्याच्याबाबतचे शेवटचे अपडेट जारी केले होते, ज्यामध्ये तो 90 टक्के तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, केएल राहुल सध्या लंडनमध्ये उपचार घेत आहेत. यामुळेच रजत पाटीदारला 2 मार्चपासून होणाऱ्या रणजी ट्रॉफी सेमीफायनलसाठी मध्य प्रदेश संघाकडून खेळण्यासाठी सोडले जात नाही. केएल फिट नसल्यास त्याला आणखी एक संधी मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा इशारा |

अजय देवगनला भेटलो नाही, पण... 'दृश्यम ३' पाहून पहिल्या भागातच मेलेला सॅम म्हणतो- मी सिनेमात जिवंत असतो तर...

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

Marathi News Live Updates: नवी मुंबई विमानतळावरून पुणे, मुंबईसह विविध शहरांसाठी वाहतूक सुविधा वाढणार; सात ऑक्टोबरपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू

SCROLL FOR NEXT