Why Rohit Sharma-Virat Kohli didn't attent Anant Ambani wedding sakal
Cricket

Anant-Radhika Wedding: आख्ख्या गावची जत्रा अनंत-राधिकाच्या लग्नाला पण... रोहित-विराट का आले नाहीत? समोर आले मोठे कारण

Rohit Sharma - Virat Kohli: रोहित शर्मा आणि विराट कोहली अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला का उपस्थित नव्हते, याचे कारण समोर आले आहे.

Pranali Kodre

Why Rohit Sharma and Virat Kohli didn't attained Anant Ambani wedding : बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचे लग्न १२ जुलै रोजी राधिका मर्चंट हिच्यासोबत झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून या लग्नाची चर्चा सुरू आहे. यापूर्वी दोन भव्य दिव्य प्री-वेडिंग इव्हेंटही झाले होते.

त्यानंतर अखेर बहुप्रतिक्षित लग्न १२ जुलै रोजी लागले. या लग्नासाठी केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील अनेक सेलिब्रेटी या लग्नासाठी मुंबईत आले होते. यामध्ये अनेक भारतीय क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीपासून ते गौतम गंभीर, इशान किशनपर्यंत अनेक क्रिकेटपटू मुंबईत अनंत-राधिकाच्या लग्नासाठी उपस्थित होते. मात्र, या सर्वांमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची अनुपस्थिति प्रकर्षाने दिसून आली.

त्यामुळे जगभरातील अनेक मोठ-मोठे सेलिब्रेटी आलेले असताना रोहित आणि विराट का नाही दिसले, असे प्रश्न अनेकांना पडले असतील.

तर खरंतर विराट सध्या भारतात नाही. तो टी२० वर्ल्ड कप विजयानंतर ४ जुलै रोजीच लंडनला रवाना झाला आहे. तिथे त्याची पत्नी अनुष्का आणि त्याची मुलं आधीच पोहचले होते. त्यामुळे तो कोणत्याही कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हता.

रोहित याआधी अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यासाठी उपस्थित होता. त्यावेळी त्याला टी२० वर्ल्ड कप विजेतेपदाबद्दल सन्मानितही करण्यात आले होते. मात्र, तो नंतर लग्नासाठी उपस्थित नव्हता. कारण तो देखील सध्या कुटुंबासह लंडनला आलेला आहे. तो १२ जुलैला लंडनमध्ये होत असलेल्या विम्बल्डन २०२४ स्पर्धेतील सामने पाहण्यासाठीही गेला होता.

त्यामुळे सध्या विराट आणि रोहित हे दोघेही सध्यातरी लंडनला असल्याचे समजत आहे. त्यामुळे ते अनंत-राधिकाच्या लग्नाला नसल्याची चर्चा आहे.

दरम्यान, हे दोघे नसले तरी सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, गौतम गंभीर, ईशान किशन, युजवेंद्र चहल, केएल राहुल, स्मृती मानधना, असे अनेक क्रिकेटपटू अनंत-राधिकाच्या लग्नासाठी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT