Women Cricket India vs Bangladesh  sakal
Cricket

Women Cricket India vs Bangladesh: भारतीय महिला क्रिकेट संघाचा मालिका विजय

महिला क्रिकेट भारत विरुद्ध बांगलादेश: Indian women's cricket team's series win...

सकाळ वृत्तसेवा

सिलहट : स्मृती मानधना (४७ धावा) व शेफाली वर्मा (५१ धावा) यांची दमदार फलंदाजी व राधा यादव, श्रेयांका पाटील, पूजा वस्त्रकार, रेणूका सिंग यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० लढतीत यजमान बांगलादेश संघावर सात विकेट व नऊ चेंडू राखून विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. शेफाली वर्मा हिची सामन्याची मानकरी म्हणून निवड करण्यात आली.

बांगलादेशकडून भारतीय महिला संघासमोर ११८ धावांचे आव्हान उभे ठाकले. स्मृती मानधना व शेफाली वर्मा या सलामी जोडीने ९१ धावांची भागीदारी करताना भारताच्या विजयाची भक्कम पायाभरणी केली. दोघांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचे आव्हान लीलया परतवून लावले. शेफालीने ३८ चेंडूंमध्ये आठ चौकारांसह ५१ धावांची खेळी साकारली. रितू मोनीच्या गोलंदाजीवर ती बाद झाली. त्यानंतर मानधना हिला आपले अर्धशतक झळकावता आले नाही. नाहिदा अख्तेर हिने तिला ४७ धावांवर बाद केले. कर्णधार हरमनप्रीत कौर (नाबाद सहा धावा) व रिचा घोष (नाबाद आठ धावा) यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

गोलंदाजांनी रोखले

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीसमोर बांगलादेशच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. दिलारा अख्तेरने ३९ धावांची व निगार सुल्तानाने २८ धावांची खेळी केली; पण कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. राधा यादव हिने २२ धावा देत दोन फलंदाज बाद केले. श्रेयांका पाटील, रेणूका सिंग व पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. बांगलादेशला आठ बाद ११७ धावांपर्यंत मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश - २० षटकांत ८ बाद ११७ धावा (दिलारा अख्तेर ३९, निगार सुल्ताना २८, राधा यादव २/२२, श्रेयांका पाटील १/२४) पराभूत वि. भारत १८.३ षटकांत तीन बाद १२१ धावा (स्मृती मानधना ४७, शेफाली वर्मा ५१, रितू मोनी १/१०).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

New Rules October 2026: 1 ऑक्टोबरपासून पैशांशी संबंधित 8 मोठे बदल! ATM, FD, EMI, UPI, LPGपासून कारपर्यंत; तुमच्या खिशावर काय परिणाम?

‘ओंकार खोटारडा, अनप्रोफेशनल’ दिग्दर्शकांच्या आरोपांना ओंकार भोजनेचं उत्तर, अभिनेत्याने सांगितली दुसरी बाजू!

Marathi News Live Updates: जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात तीन तासांपासून रेल्वे थांबली, प्रवाशांचा खोळंबा

IND VS PAK: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकी महामुकाबला कधी, कुठे, किती वाजता? LIVE कुठे पाहायचा?

SCROLL FOR NEXT