shahrukh Khan esakal
Cricket

WPL 2024 Opening Ceremony : शाहरूखच्या अदाकारीने उद्घाटन सोहळ्याला लागले चार चांद

WPL 2024 Shahrukh Khan : बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये महिला प्रीमियर लीगची सुरुवात झाली. पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Women Primer League 2024 Opening Ceremony : बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये महिला प्रीमियर लीगची सुरुवात झाली. पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. त्यापूर्वी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बॉलीवूडचा मेगास्टार शाहरुख खानने यात परफॉर्म केले. याचबरोबर शाहिद कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कार्तिक आर्यन आणि वरुण धवन यांनीही आपल्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली.

शाहरूख खानने महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यात स्टेडवर ग्रँड एन्ट्री घेतली. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात त्याने धडाकेबाज भाषण देखील करत सर्वांची मने जिंकली. याचबरोबर शाहरूख खानने त्याच्या दिलवाले दुलहनिया ले जायेंगे चित्रपटातील सिग्नेचर स्टेप स्वतः केली अन् पाचही संघाच्या कर्णधारांकडून देखील करवून घेतली.

शाहरूख सोबतच आर्यन खान, सिद्धार्थ मल्होत्रा, टायगर श्रोफ, शाहीद कपूर आणि वरूण धवनने देखील आपल्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली.

यंदाच्या वुमन्स प्रीमियर लीगमध्ये पहिला सामना हा गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिट्ल यांच्यात होत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने पहिल्या 10 षटकात 1 बाद 66 धावा केल्या होत्या. कर्णधार मेग लेनिंग एलिस कॅप्सी यांनी दुसऱ्या विकेटसाठी दमदार भागीदारी रचली. तर सलामीवीर शफाली वर्मा 1 धाव करून बाद झाली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा; तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल, आमदार रोहित पवार....

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT