IND W vs SL W  esakal
Cricket

INDW vs SLW : भारताला १७२ धावा पुरेशा नाही, उपांत्य फेरीचं गणित सोडवणं लय अवघड; जाणून घ्या Semi Final Scenario

Women’s T20I World Cup 2024 : भारतीय महिला संघाने यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या उभारली खरी, परंतु त्या धावा केल्या म्हणजे भारताचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के झाले असे नाही...

Swadesh Ghanekar

Women’s T20I World Cup 2024 INDW vs SLW Marathi Updates: स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्या अर्धशतकीय खेळीला शफाली वर्माचा मिळालेला बूस्टर डोस आजच्या सामन्यात महत्त्वाचा ठरला. भारताने महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी १७३ धावांचे आव्हान उभे केले. भारताला उपांत्य फेरीच्या शर्यतीत पोहोचण्यासाठी उर्वरित दोन सामने जिंकणे गरजेचे आहे, त्याचवेळी काही समीकरणाची जुळवाजुळवही आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात जरी भारताने १७२ धावा केल्या असल्या तरी तिथवर समाधान मानणे योग्य ठरणार नाही.

शफाली वर्मा ( ४३) हिने भारताला आक्रमक सुरुवात करून दिल्यानंतर स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या अर्धशतकी खेळीने भारताला ३ बाद १७२ धावांचा डोंगर उभारून दिली. या वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम धावसंख्या उभारली. शफाली व स्मृती यांनी पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. पण, या दोन्ही सेट फलंदाज सलग दोन चेंडूंवर माघारी परतल्याने श्रीलंकेला पुनरागमनाची संधी मिळाली. स्मृतीने ३८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ५० धावा केल्या. शफालीने ४० चेंडूंत ४ चौकारांसह ४३ धावांवर झेलबाद झाली.

कर्णधार हरमनप्रीतला दोन जीवदान मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना हरमनप्रीतने अर्धशतक पूर्ण केले. हरमनप्रीतने २७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांसह ५२ धावांची वादळी खेळी केली. भारताने ३ बाद १७२ धावा उभ्या केल्या. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील भारतीय महिला संघाची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. भारताने २०१८ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ५ बाद १९४ धावा केल्या होत्या. त्याच वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ बाद १६७ धावा भारताने केल्या होत्या. रेणुका सिंगने दुसऱ्याच चेंडूवर श्रीलंकेला धक्का दिला. विष्मी गुणारत्नेने उत्तुंग फटका मारला आणि राधा यादवने अविश्वसनीय झेल घेतला.

भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी....

  • श्रीलंकेला १२७ किंवा त्यापेक्षा कमी धावांमध्ये रोखल्यास नेट रनरेटमध्ये ते न्यूझीलंडला मागे टाकतील

  • १२४ किंवा त्यापेक्षा कमी धावांवर श्रीलंकेला रोखल्यास भारताचा नेट रनरेट सकारात्मक होईल

  • जर ९१ किंवा त्यापेक्षा कमी धावावंर श्रीलंकेला रोखण्यात भारताला यश मिळालं, तरे पाकिस्तानलाही संग मागे टाकू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT