Smriti Mandhana X/BCCIWomen
Cricket

Women's Asia Cup 2024: स्मृती मानधनाने अर्धशतक करत रचला विक्रम! फायनलमध्ये भारताचं श्रीलंकेला १६६ धावांचं आव्हान

India vs Sri Lanka Women: महिला आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने स्मृती मानधनाच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेसमोर १६६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Pranali Kodre

Women's Asia Cup 2024 Final India vs Sri Lanka: महिला आशिया कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका संघात होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करतान २० षटकात ६ बाद १६५ धावा केल्या. भारताकडून स्मृती मानधनाने अर्धशतकी खेळी केली.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून शफाली वर्मा आणि मानधनाने चांगली सुरुवातही केली होती. मात्र शफालीला ७ व्या षटकात कविशा दिलहारीने १६ धावांवर बाद केले.

त्यानंतर उमा छेत्री (९) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (११) स्वस्तात बाद झाल्या. मात्र नंतर जेमिमा रोड्रिग्सने आक्रमक खेळत स्मृतीला साथ दिली. यादरम्यान स्मृतीने अर्धशतकही पूर्ण केले.

मात्र १७ व्या षटकात आधी जेमिमाहला २९ धावांवर धावबाद झाली आणि मग कविशाने मानधनाला ६० धावांवर बाद केले. मानधनाने ४७ चेंडूत ६० धावांची खेळी केली. या खेळीत तिने १० चौकार मारले.

अखेरीस ऋचा घोषने फटकेबाजी करत भारताला १६० धावांचा टप्पा पार करून दिला. तिने १४ चेंडूत ३० धावांची खेळी केली.

श्रीलंकेकडून कविशाने २ विकेट्स घेतल्या, तर उदेशिका प्रबोधनी, सचिनी निसांसाला आणि कर्णधार चमारी अट्टापट्टू यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.

मानधनाचा विक्रम

महिला टी२० आशिया कप स्पर्धेतील मानधनाचे हे तिसरे अर्धशतक आहे. त्यामुळे ती या स्पर्धेत तीन अर्धशतक करणारी मुर्शिदा खातून आणि मिताली राजनंतरची तिसरीच खेळाडू ठरली.

त्याचबरोबर महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही ती दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. तिने २६ वेळा ५० धावांचा टप्पा पार केला आहे.

या यादीत तिने बेथ मूनीला मागे टाकले. मूनीने २५ वेळा आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ५० धावांचा टप्पा पार केला आहे. या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर सुझी बेट्स आहे. तिने २९ वेळा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५० धावांचा टप्पा पार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Interview: ६ वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या वैभवचा सामन्यापूर्वी चौघांना फोन... चौथ्या व्यक्तीसोबत ३० मिनिट चर्चा अन् आयुष्य बदलले; कोण आहे तो दिग्गज? Video

पार्टीत IPS अधिकाऱ्यांमध्ये वाद, मारहाणीत SSPला गंभीर दुखापत; मुख्यमंत्री म्हणाले, पर्सनल गोष्ट

Latest Marathi News Live Update : Ladki Bahin Yojna नवीन E-KYC सुरू झाल्याची अफवा, एका क्लिकने बँक खातं रिकामं होऊ शकतं?

‘तुला जपणार आहे’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; शेवटच्या दिवशी सेटवर केक कटिंग

Number Plate Tampering Toll Fine : वाहनधारकांनो सावधान ! महामार्गावर नंबर प्लेट लपवून टोल चुकवणे पडणार महागात; सरकार घेणार मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT