India Women Cricket Team Sakal
Cricket

Women's Asia Cup 2024: भारतीय संघ सलग तिसऱ्या विजयासह सेमीफायनलमध्ये! पाकिस्तानलाही झाला मोठा फायदा

India vs Nepal Women: महिला आशिया कप स्पर्धेत भारतीय महिला संघाने नेपाळविरुद्ध दणदणीत विजय मिळत सेमीफायनलमधील स्थानही पक्के केले.

Pranali Kodre

India Women into the Asia Cup Semifinal: महिला आशिया कप स्पर्धेत मंगळवारी भारतीय संघाने नेपाळला पराभूत करत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. डंबुला येथे झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात भारतीय महिला संघाने नेपाळ महिला संघाचा 82 धावांनी पराभव केला.

या स्पर्धेतील भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. त्यामुळे भारताने ग्रुप ए मधील अव्वल स्थान पक्के केले आहे. भारताच्या या विजयाचा पाकिस्तानलाही फायदा झाला असून नेपाळ पराभूत झाल्याने आता पाकिस्ताननेही उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे.

पाकिस्तानने ३ पैकी २ सामने जिंकलेत, तर भारताविरुद्ध पराभव स्विकारला आहे. त्यामुळे ग्रुप ए मध्ये पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मंगळवारी झालेल्या सामन्यात भारताने नेपाळसमोर १७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळला २० षटकात ९ बाद ९६ धावाच करता आल्या.

नेपाळनेला सुरुवातीलाच अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग आणि राधा यादव यांनी धक्के दिले. त्यानंतरही त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. दिप्ती शर्माने मधली फळी उद्ध्वस्त केली. नेपाळकडून सिता राणा मगरने सर्वाधिक १८ धावा केल्या.

याशिवाय कर्णधार इंदू बार्माने १४, रुबिया छेत्रीने १५ धावा केल्या, तर बिंदू रावल १७ धावांवर नाबाद राहिली. या चौघींव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावा करता आल्या नाहीत.

भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर अरुंधती रेड्डी आणि राधा यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. रेणुका सिंगने १ विकेट घेतली.

तत्पुर्वी भारताने प्रथम फलंदाजी २० षटकात ३ बाद १७८ धावा केल्या. भारताकडून शफाली वर्माने ४८ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकारांसह ८१ धावांची खेळी केली. तसेच दयालन हेमलताने ४२ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ४७ धावा केल्या.

याशिवाय जेमिमाह रोड्रिग्सने १५ चेंडूत २८ धावांची नाबाद खेळी केली, तर एस सजनाने १० धावा केल्या आणि ऋचा घोषने नाबाद ६ धावा केल्या.

नेपाळकडून गोलंदाजी करताना सिता राणा मगरने २ विकेट्स घेतल्या, तर कबिता जोशीने १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT