IND vs NZ W esakal
Cricket

Team India semi-Final scenario: भारतीय संघ पहिलाच सामना हरला, उपांत्य फेरीचा मार्ग अवघड झाला; पाकिस्तानचा संघ पुढे गेला...

How Can India Qualify For Women's T20 World Cup Semi-Final: भारतीय महिला क्रिकेट संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मागील दहा सामन्यांत पराभवाच्या मालिकेसह वर्ल्ड कपमध्ये आलेल्या न्यूझीलंडने अखेर विजयाची चव चाखली.

Swadesh Ghanekar

India Semi-final scenario Women's T20 World Cup 2024  : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप विजयाचा निर्धार करून मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडच्या संघाची ट्वेंटी-२० फॉरमॅटमधील मागील दहा सामन्यांतील कामगिरी पाहता टीम इंडिया बाजी मारेल असे वाटले होते. पण, न्यूझीलंडच्या महिलांनी त्यांची १० सामन्यांची पराभवाची मालिका खंडित केली आणि वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला. न्यूझीलंडच्या महिला संघाने ५८ धावांनी सामना जिंकून अ गटात अव्वल स्थानावर झेप घेतली. अ गटातील अन्य लढतीत आता भारताला गतविजेत्या ऑस्ट्रेलियासह पाकिस्तान व आशिया चषक विजेत्या श्रीलंकेचा सामना करायचा आहे. या गटातून दोन संघ उपांत्य फेरीत जाणार आहेत आणि पराभवामुळे टीम इंडियाचा मार्ग खडतर झाला आहे.

काल सामन्यात काय झालं?

प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाने २० षटकांत ४ बाद १६० धावा उभ्या केल्या. जॉर्जिया प्लिमर ( ३४) व सुझी बॅट्स ( २७) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. कर्णधार सोफी डिव्हाइनने ३६ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५७ धावांची नाबाद खेळी केली. भारताच्या रेणुका सिंगने २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण संघ १९ षटकांत १०२ धावांत तंबूत परतला. कर्णधार हरमनप्रीत कौर ( १५) हिने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. रोसमेरी मेयरने ४ आणि ली ताहुहूने ३ विकेट्स घेतल्या. एडन कार्सनने दोन बळी टिपले.

भारताला उपांत्य फेरीत जाण्यासाठी....

न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाचा रन रेट -२.९०० असा प्रचंड घसरला आहे. भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तान ( रविवार) आणि श्रीलंका ( ९ ऑक्टोबर) यांच्याविरुद्ध विजय मिळवणे गरजेचे आहे. तेही मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, ज्याने त्यांना चार गुणच मिळणार नाहीत, तर नेट रन रेटही सुधारेल. भारताचा साखळी गटातील शेवटचा सामना सहा वेळा वर्ल्ड कप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी आहे. पण, हा सामना गमावल्यास भारताला न्यूझीलंडने उर्वरित दोन सामने गमवावे, अशी प्रार्थना करावी लागेल. तेव्हा नेट रन रेटवर सर्व गणित येऊन थांबेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT