Pakistan Fielding Video Sakal
Cricket

Video Viral: परंपरा कायम! पाकिस्तानच्या पुरुष व महिला क्षेत्ररक्षकांमध्ये काहीच फरक नाही; चेंडू अडवण्यासाठी धडाम धुडूम होतंच...

Pakistan Fielder collide while fielding: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या दोन क्षेत्ररक्षकांची चेंडू आडवताना धडक झाल्याचे दिसले.

Pranali Kodre

Pakistan Fielding Video: पाकिस्तान क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षणाची नेहमीच चर्चा होत असते. अनेकदा पाकिस्तानच्या पुरुष संघाच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी त्यांचे क्षेत्ररक्षक झेल घेताना धडकतात, कधीकधी झेल सुटतो, तर कधी कधी चेंडू आडवण्यासाठी एकाचवेळी अनेक खेळाडू पळतात, असे अनेक व्हिडिओ आत्तापर्यंत व्हायरल झाले आहेत.

आता असाच प्रकार महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतही पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेत सोमवारी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात दुबईला सामना झाला.

या सामन्यात पाकिस्तानच्या महिला संघाकडूनही ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, एकावेळी तर दोघीजणी चेंडू आडवताना एकमेकींना धडकल्या. याचा व्हिडिओही आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

झाले असे की न्यूझीलंड संघ फलंदाजी करत होता. यावेळी चौथ्या षटकात पाकिस्तानकडून सादिया इक्बाल गोलंदाजी करत होती. तिने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर न्यूझीलंडच्या जॉर्जिया प्लिमरने मिड ऑफच्या दिशेने शॉट मारला.

यावेळी तों चेंडू आडवण्यासाठी पळत येत असताना पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षक नाशरा संधी आणि सिद्रा आमीन एकमेकींनाच जोरात धडकल्या. त्यामुळे दोघींनाही चेंडू पकडताही आला नाही. सुदैवाने दोघींपैकी कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर न्यूझीलंड संघ २० षटकात ६ बाद ११० धावाच करू शकले होते. त्यांच्याकडून सुझी बेट्सने सर्वाधिक २८ धावा केल्या, तर ब्रुक हालीडेने २२ धावा केल्या. या दोघींव्यतिरिक्त कोणीही २० धावांचा टप्पा पार केला नाही. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना नाशरा संधूने ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर १११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ ११.४ षटकातच ५६ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून कर्णधार फातिमा सनाने २१ धावा केल्या, तर मुनीबा अलीने १५ धावा केल्या. या दोघींव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. न्यूझीलंडकडून गोलंदाजी कराताना एमेलिया केरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये, तर भारत बाहेर

दरम्यान, न्यूझीलंडने या विजयासह महिला टी२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. मात्र, यामुळे पाकिस्तानसह भारताचेही स्पर्धेतील आव्हान संपले.

ए ग्रुपमधून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघांनी अनुक्रमे ८ आणि ६ गुणांसह सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या ग्रुपमधून भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांचे आव्हान साखळी फेरीत संपले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT