WTC Ponts Table 2023-25 sakal
Cricket

WTC Ponts Table 2023-25 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल, इंग्लंड 'या' स्थानावर; भारत आहे तरी कुठं?

WTC Ponts Table 2023-25 : वेस्ट इंडिजविरुद्ध एजबॅस्टन मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने 10 गडी राखून विजय मिळवत मालिका 3-0 ने जिंकली.

Kiran Mahanavar

WTC Ponts Table 2023-25 : वेस्ट इंडिजविरुद्ध एजबॅस्टन मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने 10 गडी राखून विजय मिळवत मालिका 3-0 ने जिंकली. ही मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25च्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होता, पण आता मालिका संपल्यानंतर थेट सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तर वेस्ट इंडिजचा संघ आता WTCच्या तिसऱ्या आवृत्तीच्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​च्या पॉइंट टेबलमध्ये, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय संघ अजूनही 68.52 गुणांच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. एकूण 62.50 गुणांसह ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

या यादीत न्यूझीलंड आणि श्रीलंका तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. ज्यात किवी संघ आणि श्रीलंका या दोघांची 50-50 गुणांची टक्केवारी आहे. WTC च्या तिसऱ्या आवृत्तीच्या गुणतालिकेत पाकिस्तान संघ 36.66 गुणांच्या टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे.

आता WTC 2023-25 ​​च्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंड संघाची एकूण 31.55 गुणांची टक्केवारी आहे, ज्यात त्यांनी आतापर्यंत एकूण 12 कसोटी सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजचे संघ शेवटच्या तीन स्थानावर आहेत. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्याकडे 25-25 गुणांची टक्केवारी आहे. तर वेस्ट इंडिजकडे 6 कसोटी सामन्यांमध्ये केवळ एक विजयामुळे 22.22 गुणांची टक्केवारी आहे. त्यापैकी केवळ 4 सामने गमावले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. इंग्लंड संघ आता 21 ऑगस्टपासून घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे, त्यातील पहिला सामना मँचेस्टरच्या मैदानावर खेळवला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ठाकरेंचं चॅलेंज फडणवीसांनी स्वीकारलं; म्हणाले, एक लाख रुपये जिंकलो!

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पुणे, दौड, काष्टी रुळाचे काम होणार; नागपूर-पुणे मार्गावरील गाड्या झाल्या रद्द..

Nashik Grapes Export : नाशिकच्या द्राक्षांचा परदेशात डंका! नेदरलँड अन् जर्मनीसाठी पहिली ३० टनांची खेप रवाना

Chhatrapati Sambhajinagar News : शहर पर्यटन वाढीला आडकाठी! नियोजित पर्यटन धोरण वर्षभरापासून रखडले

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

SCROLL FOR NEXT