wpl 2024 Beth Mooney to lead Gujarat Giants in Women's Premier League season 2 Cricket News In Marathi sakal
Cricket

WPL 2024 : गुजरात संघाची मोठी घोषणा! अचानक बदलला कर्णधार, 'या' खेळाडूकडे दिली धूरा

Women's Premier League Gujarat Giants News : महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगामान 23 फेब्रुवारीपासून बेंगळुरूमध्ये रंगणार आहे.

Kiran Mahanavar

Women's Premier League Gujarat Giants : महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगामान 23 फेब्रुवारीपासून बेंगळुरूमध्ये रंगणार आहे. यावेळी लीगचे सामने दोन टप्प्यात खेळले जाणार आहेत. पहिला टप्पा बेंगळुरू आणि दुसरा टप्पा दिल्लीत होईल.

महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये पाच संघांमध्ये एकूण 22 सामने खेळले जातील. ही लीग सुरू होण्यापूर्वी गुजरात जायंट्स संघात मोठा बदल करण्यात आला आहे. गुजरात जायंट्सने नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियाची फलंदाज बेथ मुनी डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रात गुजरात जायंट्स संघाचे नेतृत्व करणार आहे. तर भारतीय अष्टपैलू स्नेह राणा उपकर्णधार असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की WPL च्या पहिल्या हंगामात मुनीची गुजरात जायंट्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले होते. पण, दुखापतीमुळे तिला पहिल्या सामन्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. यानंतर स्नेह राणाने संपूर्ण हंगामात संघाचे नेतृत्व केले.

बेथ मुनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. 2014, 2018, 2020 आणि 2023 मध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघांचा भाग असण्याव्यतिरिक्त, ती 2022 ODI वर्ल्ड कप आणि 2022 च्या बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघांमध्ये होती.

तसेच डिसेंबर 2017 मध्ये तिने ICC T20I प्लेयर ऑफ द इयर आणि इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर असे दोन्ही पुरस्कार जिंकले आहे. महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रात गुजरात जायंट्स 25 फेब्रुवारीला बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल.

WPL 2024 साठी गुजरात जायंट्स संघ : ऍशले गार्डनर, बेथ मूनी, दयालन हेमलता, हरलीन देओल, लॉरा वोल्वार्ड, शबनम शकील, स्नेह राणा, तनुजा कंवर, फोबी लिचफिल्ड, मेघना सिंग, त्रिशा पूजाता, काश्वी गौतम, प्रिया मिश्रा, लॉरेन चीटल, कॅथरीन कृष्णा ब्रायस, मनीषा कश्मीर , तरन्न्नुम पठाण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT