Sangeeta Phogat Spin Yuzvendra Chahal Marathi News
Sangeeta Phogat Spin Yuzvendra Chahal Marathi News sakal
क्रिकेट

Viral Video : युझवेंद्र चहल आला रडकुंडी; 25 वर्षीय महिला कुस्तीपटूने उचलले खांद्यावर अन्...

Kiran Mahanavar

Sangeeta Phogat Spin Yuzvendra Chahal : कुस्तीपटू संगीता फोगट आणि भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल यांचा एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये संगीता फोगटने युझवेंद्र चहलला आपल्या दोन्ही हातांनी वर उचलून फिरवल्याचे दिसत आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चहल आणि संगीता यांच्यातील या मजेशीर प्रसंगाचा फॅन्स एन्जॉय करत आहेत.

ही घटना शुक्रवारी रात्री एका डान्स शोदरम्यान पाहायला मिळाली. त्या रात्री पार्टी होती आणि या पार्टीत युजवेंद्र चहल, त्यांची पत्नी धनश्री वर्मा आणि संगीता फोगट यांच्यासह अनेक मोठे चेहरे उपस्थित होते.

चहलची पत्नी या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. ती पाच फायनलिस्टमध्ये होती, पण जिंकू शकली नाही. संगीता फोगट देखील या शोचा एक भाग होती, परंतु ती बाहेर गेली. मात्र ती त्या पार्टी आली होती. यावेळी सर्वजण पार्टीचा आनंद लुटत असताना संगीता फोगटने चहलला दोन्ही हातांनी वर उचलले आणि त्याला फिरवायला सुरुवात केली.

हे पाहून आजूबाजूचे लोकही खूप हसायला लागले. यावेळी चहलचा चेहराही पूर्णपणे लाल झाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

जर आपण चहलबद्दल बोललो तर, 33 वर्षीय लेग स्पिनर टीम इंडियामधून बराच काळ बाहेर आहे. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. गतवर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात यजुवेंद्र चहलचा टीम इंडियाच्या वनडे मालिकेत समावेश करण्यात आला असला तरी या काळात चहलने एकही सामना खेळला नाही.

यजुवेंद्र चहलची नजर आता आयपीएलवर असेल. जिथे तो राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. राजस्थान रॉयल्स 24 मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध त्यांच्या आयपीएल मोहिमेची सुरुवात करणार आहे. अलीकडेच बीसीसीआयने केंद्रीय कराराची घोषणा केली होती आणि युझवेंद्र चहलला त्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT