yash dayal. esakal
Cricket

IPL 2025 Retention : BCCI ने घेतला RCB च्या 'फायद्याचा' निर्णय‍! खेळाडूचा पगार १ कोटीने कमी होणार, फ्रँचायझीचे पैसे वाचणार

Royal Challengers Bengaluru relief : न्यूझीलंडविरुद्ध आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने काल केली आणि RCB ला मोठा दिलासा मिळाला...

Swadesh Ghanekar

IPL 2025 Retention RCB : भारतीय नियामक मंडळाने (BCCI) न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला दिलासा मिळाला आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ साठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी भारताची न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिके होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारतीय संघात आरसीबीचा गोलंदाज यश दयालला स्थान देण्यात आलेले नाही.

बांगलादेशला कसोटी मालिकेतील १७ खेळाडूंच्या संघात स्थान देण्यात आले होते. परंतु त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी यश दयालची भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनकॅप्ड खेळाडू म्हणून आरसीबी संघ यश दयालला कायम ठेवू शकतो.

बीसीसीआयच्या नियमानुसार फ्रॅंचायझी जास्तीत जास्त दोन अनकॅप्ड खेळाडूंना प्रत्येकी ४ कोटी रूपये देऊन संघात कायम ठेवू शकतात. जर यश दयालने भारतीय संघात पदार्पण केले असते तर, बीसीसीआयच्या नियमानुसार यश दयालला संघात कायम ठेवण्यसाठी आरसीबीला १८ कोटी, १४ कोटी किंवा ११ कोटी मोजावे लागले असते. मागील हंगामातील आयपीएलमध्ये यश दयालसाठी आरसीबीने ५ कोटी रूपये मोजले होते. परंतु नव्या नियमानुसार यशला आता ४ कोटी रूपये द्यावे लागतील. त्यामुळे आरसीबीच्या पर्समध्ये आता १ कोटी रूपयांची बचत होणार आहे.

आयपीएल २०२४ च्या हंगामात दयालने १४ सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या होत्या. तर उपांत्यपूर्व फेरीत चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या सामन्यात यश दयालने अंतिम षटकात एमएस धोनीला बाद केले आणि तो सामना आरसीबीने जिंकला होता.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप

राखीव- हर्षित राणा, मयंक यादव, नितीश कुमार रेड्डी, प्रसीध कृष्णा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT