Yashasvi Jaiswal esakal
Cricket

Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालनं विराटलाही टाकलं मागं; इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत केला 'हा' मोठा विक्रम

India Vs England 5th Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी आपली पहिली धाव घेतली अन् मोठा विक्रम केला.

अनिरुद्ध संकपाळ

Yashasvi Jaiswal Broke Virat Kohli Record : भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने रन मशिन विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला. त्याने भारताकडून इंग्लंविरूद्धच्या एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. यशस्वी जैस्वालने विराट कोहलीला देखील मागे टाकले.

मालिकेच्या चौथ्या कसोटीतच यशस्वी जैस्वालने विराट कोहलीच्या 655 धावांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. आज पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने आपला पहिला डाव सुरू केला. यशस्वीने एक धाव घेताच तो इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय कुलदीप यादवने उलटा पाडला. त्याच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ बघता बघता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

कुलदीप यादवची साथ अश्विनने उत्तमप्रकारे दिली. त्याने 4 विकेट्स घेत इंग्लंडच्या शेपटला फार वळवळ करू दिली नाही. अखेर इंग्लंडचा पहिला डाव 218 धावात संपुष्टात आला. चहापानानंतर तिसऱ्या सत्राची काही षटकेच झाली असताना इंग्लंडचा डाव संपला.

त्यानंतर भारताने आपला दुसरा डाव सुरू केला. नेहमीप्रमाणे आपल्या आक्रमक शैलीत रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने डावाची सुरूवात केली. यशस्वीने एक धाव पूर्ण करत इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याची मान पटकावला.

त्याचबरोबर रोहित शर्माने देखील मार्क वूडच्या 151 kmph वेगाने टाकलेल्या चेंडूवर तेवढ्याच वेगाने षटकार मारत WTC मधील षटकारांचे आपले अर्धशतक पूर्ण केलं. याचबरोबर रोहित शर्मा हा WTC मध्ये भारताकडून 50 षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

Ashadhi Wari: पंढरपूरला चातुर्मासात रोज कीर्तनाची साडेतीनशे वर्षांची परंपरा

Flight Cancelled : तीन तासांची प्रतीक्षा अन् विमान रद्द

SCROLL FOR NEXT