Yashasvi Jaiswal Creates History Becomes 1st Indian To Hit 10 Sixes In An Innings Of Test Match ind vs eng cricket news in marathi 
Cricket

Yashasvi Jaiswal Ind vs Eng : 6,6,6,6,6,6.... यशस्वी जैस्वाल बनला टीम इंडियाचा 'सिक्सर किंग'! तुफानी फलंदाजी करत केला मोठा विक्रम

Yashasvi Jaiswal Hits Most Sixes by an Indian in a Test Innings : भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे.

Kiran Mahanavar

India vs England 3rd Test : इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीत यशस्वी जैस्वालने इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 10 षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाठीच्या दुखापतीमुळे यशस्वीने मैदान सोडले होते. पण शुभमन गिल धावबाद झाल्यानंतर चौथ्या दिवशी मैदानावर आला तेव्हा तो त्याच लयीत होता.

यशस्वी जैस्वालने भारतीय खेळाडू म्हणून कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी नवज्योत सिंग सिद्धू आणि मयंक अग्रवाल यांना मागे टाकले आहे. जैस्वालने एका डावात 10 षटकार मारले आहेत. तर 1994 मध्ये लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात सिद्धूने 8 षटकार ठोकले होते. यानंतर मयंक अग्रवालने 2019 मध्ये इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात एका डावात 8 षटकार मारण्याचा विक्रम आहे.

यासोबतच यशस्वी जैस्वालने एका मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला आहे. या प्रकरणात त्याने कर्णधार रोहित शर्माला मागे सोडले आहे. रोहितने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 19 षटकार मारले होते, मात्र आता यशस्वीने 20 षटकार मारून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडविरुद्ध अजून दोन कसोटी सामने बाकी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT