Yashasvi Jaiswal  esakal
Cricket

IND vs ENG 3rd Test : यशस्वी-शुभमन जोडीचा धुमाकूळ; भारताची सामन्यावर मजबूत पकड

IND vs ENG 3rd Test Yashasvi Jaiswal : सिराजच्या भेदक माऱ्यानंतर यशस्वीचा शतकी तडाखा, इंग्लंड पराभवाच्या छायेत?

अनिरुद्ध संकपाळ

India Vs England 3rd Test Day 3 : भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने विशाखापट्टणमवर द्विशतकी खेळी केली होती. आता पुढच्याच राजकोट कसोटीत त्याने दुसऱ्या डावात शतकी खेळी करत भारताला विजयाच्या मार्गावर अग्रेसर केलं आहे.

तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजने इंग्लंडला 319 धावात रोखले. भारताने 126 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात 2 बाद 196 धावा केल्या. सुरूवात संथ करणाऱ्या यशस्वी जैस्वालने नंतर तुफान फटकेबाजी करत इंग्लंडचा बॅझबॉल मोडूनच खाल्ला. त्याला शुभमन गिलने नाबाद अर्धशतक ठोकत चांगली साथ दिली.

भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा पहिला डाव 445 धावांवर संपला. इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. सिराजने 4 विकेट्स घेत इंग्लंडचे कंबरडे मोडले. बेन डकेटने एकाकी किल्ला लढवत 153 धावांची दमदार खेळी केली. बेन स्टोक्सने देखील 40 धावांचे योगदान दिलं.

भारताने 126 धावांची आघाडी घेतल्यानंतर आपला दुसरा डाव सुरू केला. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने 30 धावांची सलामी दिली. मात्र इंग्लंडने चांगला मारा केल्यामुळे भारताची सुरूवात संथ झाली. मात्र रोहित बाद झाल्यानंतर यशस्वीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली.

त्याने शुभमन गिल सोबत भागीदारी रचण्यास सुरूवात केली. सुरूवातीला 73 चेंडूत 35 धावा करणाऱ्या यशस्वीने चहापानानंतर गिअर बदलला अन् आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 122 चेंडूत शतक पूर्ण केले.

पाठोपाठ गिलने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी रचली. मात्र शतकानंतर यशस्वीच्या पाठीला दुखापत झाली अन् त्याने मैदान सोडले. त्यानंतर आलेला रजत पाटीदार शुन्यावर बाद झाला. अखेर कुलदीप यादव आणि शुभमन गिलने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपवला.

खेळ संपला त्यावेळी भारताच्या दुसऱ्या डावात 2 बाद 196 धावा केल्या होत्या. भारताकडे दिवसअखेर 322 धावांची आघाडी आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT