Yashasvi Jaiswal wins ICC Player of Month Award Marathi News sakal
Cricket

Yashasvi Jaiswal : जलवा है हमारा...! यशस्वी जैस्वालच्या नावावर आणखी एक विक्रम; आता मिळाला ICC चा मोठा अवॉर्ड

टीम इंडियाचा स्टार खेळाडू यशस्वी जैस्वाल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान त्याच्या बॅटने ज्या प्रकारे कहर केला ते सर्वांनी पाहिले असेल.

Kiran Mahanavar

Yashasvi Jaiswal wins ICC Player of Month Award : टीम इंडियाचा स्टार खेळाडू यशस्वी जैस्वाल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान त्याच्या बॅटने ज्या प्रकारे कहर केला ते सर्वांनी पाहिले असेल. इतक्या लहान वयात त्याने या मालिकेत दोन बॅक टू बॅक द्विशतके झळकावली आणि मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू बनला.

एवढेच नाही तर, या मालिकेत त्याने अनेक विक्रम मोडले आहेत. दरम्यान, आता आयसीसीने मोठ्या पुरस्कारासाठी यशस्वी जैस्वालची निवड केली आहे. होय, जयस्वालची ICC ने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूसाठी निवड केली आहे.

यावेळी तीन खेळाडूंना आयसीसीने प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन दिले होते. यशस्वी जैस्वालशिवाय न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि श्रीलंकेचा पथुम निसांका होता. मात्र जैस्वालने या दोघांनाही मागे टाकत हा पुरस्कार पटकावला आहे.

आयसीसीने म्हटले आहे की, जैस्वालच्या आकडेवारीवरून तो जगातील सर्वोत्तम सलामीचा फलंदाज आहे. जैस्वाल आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या चक्रात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. फेब्रुवारी महिन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये दोन शानदार द्विशतके झळकावली.

जैस्वालने विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या डावात 219 धावा केल्या आणि त्यानंतर राजकोट येथे खेळल्या गेलेल्या पुढील कसोटीच्या दुसऱ्या डावात द्विशतक झळकावले. इतकंच नाही तर जैस्वालने फेब्रुवारीमध्ये अनेक विक्रम केले आणि राजकोटमध्ये खेळताना वसिम अक्रमच्या एका कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

जैस्वालने 22 वर्षे आणि 49 दिवस वयात सलग दुहेरी शतके झळकावून सर डोनाल्ड ब्रॅडमन आणि भारताच्या विनोद कांबळी यांची बरोबरी केली. यासोबतच मार्चमध्ये त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 1000 धावाही पूर्ण केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT