IND vs ZIM T20 Series Esakal
Cricket

IND vs ZIM T20 Series: भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर रवाना; बीसीसीआयने शेअर केले खेळाडूंचे फोटो

IND vs ZIM T20 Series: भारतीय क्रिकेट संघ 6 जुलैपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी झिम्बाब्वेला रवाना झाला आहे. यादरम्यान बीसीसीआयने खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

IND vs ZIM T20 Series: भारतीय क्रिकेट संघ 6 जुलैपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी झिम्बाब्वेला रवाना झाला आहे. यादरम्यान बीसीसीआयने खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

झिम्बाब्वेला रवाना; टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज

29 जून रोजी टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ बार्बाडोसमधील खराब हवामानामुळे भारतात परतू शकलेला नाही, तर 6 जुलैपासून झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ स्पर्धेसाठी 2 जुलै रोजी सकाळी निघाले आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना स्थान मिळाले असून, शुभमन गिल संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या मालिकेत वी.वी.एस लक्ष्मण प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारणार आहे.

युवा खेळाडूंचा समावेश, शुभमन गिलकडे नेतृत्वाची धुरा

टीम इंडियाने झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप पदार्पण न केलेल्या काही खेळाडूंचाही समावेश केला आहे, ज्यामध्ये IPL 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अभिषेक शर्मा, रायन पराग आणि तुषार देशपांडे यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय शुभमन गिल संघाचे कर्णधारपद सांभाळत असताना ऋतुराज गायकवाड आणि ध्रुव जुरेल यांनाही संघात स्थान मिळाले आहे.

प्रदीर्घ काळानंतर वॉशिंग्टन सुंदरही टीम इंडियात पुनरागमन करताना दिसत आहे. या मालिकेतील सर्व सामने हरारे स्टेडियमवर खेळवले जातील, ज्यामध्ये पहिला आणि दुसरा सामना 6 आणि 7 जुलै रोजी होणार आहे. मालिकेतील शेवटचे तीन सामने 10, 13 आणि 14 जुलै रोजी होणार आहेत.

झिम्बाब्वेनेही केला संघ जाहीर

या T20 मालिकेसाठी भारताने आधीच आपला संघ जाहीर केला होता, तर झिम्बाब्वे क्रिकेटनेही 1 जुलै रोजी आपला 17 सदस्यीय संघ जाहीर केला. सिकंदर रझा या संघाचे कर्णधारपद भूषवणार असून, या संघात अनेक नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, त्यापैकी एक म्हणजे देशांतर्गत क्रिकेट सामन्यात एका पारीत 300 धावा करणारा झिम्बाब्वेचा पहिला खेळाडू आहे.

T20 मालिकेसाठी भारत आणि झिम्बाब्वेचे संघाची यादी

भारत - शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे.

झिम्बाब्वे - सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, जोनाथन कॅम्पबेल, तेंडाई चतारा, ल्यूक जोंगवे, इनोसंट कैया, क्लाइव्ह मदांडे, वेस्ली माधवायर, तदिवनाशे मारुमनी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्रँडन मावुथा, आशीर्वाद मुझाराबानी, आशिर्वाद मुझाराबानी, डी. रिचर्ड नगारवा, मिल्टन शुम्बा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey Trap Miraj : बुलाती है मगर जानेका नहीं! सोशल मीडियाचा नाद लावून पोरं बाद करणारी टोळी, मिरजेत फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; कोल्हापूर कनेक्शन

Jalna Crime: पोलिस रेकॉर्डवरील एकाचा खून; जालन्यात थरार, जमिनीच्या वादातून चौघांकडून सशस्त्र हल्ला

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

SCROLL FOR NEXT