Yuvraj Singh Playing XI Sakal
Cricket

Yuvraj Singhच्या प्लेइंग-11 मध्ये धोनीला स्थान नाही; सचिन-रोहितसह तीन भारतीय संघात, स्वत:चीही 'या' क्रमांकासाठी केली निवड

Yuvraj Singh's Playing XI: युवराज सिंगने त्याची सार्वकालिक प्लेइंग-११ निवडली आहे.

Pranali Kodre

Yuvraj Singh's Playing XI: भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने वर्ल्ड चॅम्पिनयशीप ऑफ लीजंड्स स्पर्धेचे इंडिया चॅम्पियन्स संघाकडून विजेतेपद जिंकले आहे. या स्पर्धेदरम्यान, युवराज सिंगने त्याची सर्वकालिन सर्वोत्तम प्लेइंग-११ निवडली आहे.

त्याने त्याच्या या प्लेइंग-११ मध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा या तीन भारतीय खेळाडूंना स्थान दिले आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीलाही स्थान दिले नाही.

युवराजने सलामीसाठी सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग यांना निवडले आहे, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी रोहित शर्मा व विराट कोहली यांची निवड केली. पाचव्या क्रमांकावर युवराजने एबी डिव्हिलियर्सला स्थान दिले आहे. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून युवराजने ऍडम गिलख्रिस्टला निवडले आहे.

युवराजने सातव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नला ठेवले आहे, त्यानंतर श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला स्थान दिले आहे. वेगवान गोलंदाजीसाठी त्याने ग्लेन मॅकग्रा आणि वासिम आक्रमला स्थान दिले आहे, तर इंग्लंडचा अष्टपैलू अँड्र्यु फ्लिंटॉफलाही त्याने या संघात निवडले आहे. याशिवाय युवराजने स्वत:ला १२ वा खेळाडू म्हणून निवडले आहे.

दरम्यान, युवराजच्या नेतृत्वाखाली इंडिया चॅम्पियन्सने वर्ल्ड चॅम्पिनयशीप ऑफ लीजंड्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचा पराभव करत विजेतेपद जिंकले आहे.

युवराजची सर्वोत्तम प्लेइंग-११ -

सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ऍडम गिलख्रिस्ट (यष्टीरक्षक), अँड्र्यू फ्लिंटॉफ, शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन, ग्लेन मॅकग्रा, वासिम आक्रम, युवराज सिंग (१२ वा खेळाडू)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Frame Movie Review : माणुसकी की कॅमेऱ्याची लेन्स? नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांच्या हटके भूमिकेनं वेधलं लक्ष; वाचा 'फ्रेम' चित्रपटाचा रिव्ह्यू

Pune: जुन्नरच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची नवी पहाट; सुराळे शाळेत आधुनिक संगणक कक्ष सुरू

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक ऑडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT