Yuvraj Singh Virat Kohli T20 WC 2024  esakal
Cricket

Yuvraj Singh T20 WC 2024 : रोहितपेक्षा 'या' दिग्गजाच्या गळ्यात असावं वर्ल्डकपचं मेडल... युवराज सिंगनं कोणाचं नाव घेतलं?

अनिरुद्ध संकपाळ

Yuvraj Singh Virat Kohli T20 WC 2024 : भारताचा दिग्गज माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने भारताची रन मशिन विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक केलं आहे. तो म्हणाला की सध्याच्या घडीचा विराट कोहली हा सर्वात चांगला फलंदाज आहे. गेल्या वर्षी आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.

विराट कोहली आता भारताच्या टी 20 वर्ल्डकप संघात निवडला गेला आहे. वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत हा वर्ल्डकप 1 जून पासून सुरू होत आहे. विराट कोहली हा 2011 च्या वनडे वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग होता. मात्र भारताने बऱ्याच काळापासून वर्ल्डकप जिंकलेला नाही. युवराज सिंगच्या मते विराट कोहली हा वर्ल्डकप मेडलचा सर्वात जास्त हकदार आहे.

आयसीसीशी बोलताना टी 20 वर्ल्डकप 2024 चा ब्रँड एम्बेसडर युवराज म्हणाला की, 'नक्कीच विराट कोहलीने या जनरेशनमधील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. तो या जनरेशनचा सर्वोत्तम फलंदाज आहे. मला वाटते की तीनही फॉरमॅटमधील हा एक असा व्यक्ती आहे ज्याला वर्ल्डकप मेडलची गरज आहे. त्याच्या जवळ एक आहे. मात्र मला माहिती आहे की तो यावर समाधानी नाही. मला वाटतं की तो यंदाच्या वर्ल्डकप मेडलचा हकदार आहे.'

युवराज पुढे म्हणाला की, 'मला वाटते की तो त्याचा बेस्ट गेम कोणता आहे हे जाणतो. त्याला माहिती आहे की तो शेवटपर्यंत टिकला तर भारतासाठी मॅच जिंकणं सोपं होतं. तो परिस्थिती लगेच ओळखतो, कोणत्या स्थितीत कशी फलंदाजी करायची आहे.'

'कोणत्या गोलंदाजाविरूद्ध आक्रमण करायचं अन् कोणत्या गोलंदाजाविरूद्ध सिंगल्स घ्यायच्या हे त्याला माहिती आहे. दबावात आपला खेळ कसा बदलायचा हे त्याला चांगला ठाऊक आहे.'

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT