Yuvraj Singh Marathi News sakal
Cricket

Yuvraj Singh : 'मी गुरुदासपूरमधून निवडणूक....' सिक्सर किंग युवराजांनी केली मोठी घोषणा

अवघ्या काही दिवसांवर देशात पुन्हा लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यावेळीही क्रीडा जगतातील अनेक दिग्गज खेळाडू निवडणुकीच्या रिंगणात उतणार आहे.

Kiran Mahanavar

Yuvraj Singh Lok Sabha Election Gurdaspur : अवघ्या काही दिवसांवर देशात पुन्हा लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यावेळीही क्रीडा जगतातील अनेक दिग्गज खेळाडू निवडणुकीच्या रिंगणात उतणार आहे. गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगबद्दलही अशा बातम्या येत होत्या, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की माजी क्रिकेटपटू पंजाबमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. आता खुद्द युवराज यांनी या प्रकरणी मोठी घोषणा केली आहे.

अलीकडेच वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजप युवराज सिंगला लोकसभा निवडणुकीचे तिकीट देऊ शकते. पक्षाच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या दिग्गज क्रिकेटपटूची भेट घेऊन याबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. पण त्याने हे दावे खोटी असल्याचे ट्विट करून सर्व अफवा आणि अनुमानांना पूर्णविराम दिला आहे.

युवराज सिंगने शुक्रवार 1 मार्च रोजी त्याच्या अधिकृत 'X' खात्यावर एक पोस्ट टाकून ही बाब स्पष्ट केली. तो म्हणाला की, मीडिया रिपोर्ट्सच्या विरोधात. मी गुरुदासपूरमधून निवडणूक लढवत नाही. गरजू लोकांना विविध माध्यमे आणि क्षमतांद्वारे आधार देणे आणि मदत करणे ही माझी आवड आहे आणि मी माझ्या फाऊंडेशनच्या माध्यमातून हे करत राहीन.

युवराजच्या आधी अनुभवी फलंदाज गौतम गंभीरने 2019 च्या लोकसभा निवडणुक लढला होता. आणि पूर्व दिल्लीतून विजय मिळावला. गंभीरप्रमाणे युवराजही लोकसभा निवडणुकीपासून सक्रिय राजकारणात उतरेल, असे मानले जात होते, परंतु आता तसे होताना दिसत नाही. मात्र, गुरुदासपूरची जागा अजूनही भाजपकडे आहे, जिथून प्रसिद्ध बॉलिवूड स्टार सनी देओल खासदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT