Sikandar Raza | Shubman Gill | India vs Zimbabwe Sakal
Cricket

IND vs ZIM, 4th T20I: झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं अर्धशतक हुकलं, पण केला मोठा विक्रम अन् भारतासमोर ठेवलं 153 धावांचं लक्ष्य

Sikandar Raza: भारताविरूद्धच्या चौथ्या टी२० सामन्यांत झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

India vs Zimbabwe, 4th T20I: भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यातील चौथा टी२० सामना शनिवारी (१३ जुलै) हरारेला होत आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने भारतासमोर विजयासाठी १५३ धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १५२ धावा केल्या.

झिम्बाब्वेकडून वेस्ली मधेवेरे आणि तादिवानशे मरुमणी यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनीही पॉवर-प्लेमध्ये विकेट न गमावता संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. त्यांनी ६३ धावांची अर्धशतकी भागीदारीही केली.

मात्र, हे दोघेही लागोपाठच्या षटकांमध्ये बाद झाले. मधेवेरेने २५ धावा केल्या, तर मारुमणीने ३२ धावा केल्या. त्यानंतरही झिम्बाब्वेने ब्रायन बेनेट (९) आणि जोनाथन कॅम्पबेल (३) यांनीही झटपट विकेट्स गमावल्या.

मात्र या दरम्यान सिकंदर रझाने एक बाजू सांभाळली होती. त्याने संघाला १४० धावांचा टप्पा सहज पार करून दिला. मात्र अर्धशतकाजवळ असताना १९ व्या षटकात त्याला पदार्पणवीर तुषार देशपांडेने बाद केले. रझाने २८ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ४६ धावा केल्या.

या खेळीसह त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २००० हून अधिक धावा आणि ५० हून अधिक विकेट्स घेणारा पाचवा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.

यापूर्वी असा पराक्रम शाकिब अल हसन, मोहम्मद हाफिज विरनदीप सिंग आणि मोहम्मद नबीने केला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २००० धावा करणारा रझा झिम्बाब्वेचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

दरम्यान, तो बाद झाल्यानंतर झिम्ब्बावेने डायन मायर्स (१२) आणि क्लाईव्ह मदांडे (७) यांच्याही विकेट गेल्या.

भारताकडून खलील अहमदने २ विकेट्स घेतल्या, तर तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT