India vs Zimbabwe X/BCCI
Cricket

IND vs ZIM, 5th T20I: सॅमसनचं झुंझार अर्धशतक अन् दुबेची तुफानी फटकेबाजी, भारताचं झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 168 धावांचं लक्ष्य

India vs Zimbabwe: टी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताची फलंदाजी अडखळली असताना संजू सॅमसनने चांगली झुंज देत अर्धशतक झळकावले.

Pranali Kodre

India vs Zimbabwe 5th T20I: झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात टी20 मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना रविवारी (14 जुलै) हरारे येथे होत आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 167 धावा केल्या. भारताकडून संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी केली.

या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजासाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वालने आक्रमक सुरूवात केली, मात्र 5 चेंडूत 12 धावा केल्यानंतर तो बाद झाला.

नंतर कर्णधार शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे देखील स्वस्तात बाद झाले. मात्र नंतर संजू सॅमसनने आधी रियान परागला साथीला घेत डाव सावरला. या दोघांनी 65 धावांची भागीदारी करत भारताला 100 धावांचा टप्पा पार करून दिला.

मात्र रियान 24 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. यानंतर सॅमसनला शिवम दुबेने साथ दिली. सॅमसनने अर्धशतकही पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर तो 18 व्या षटकात बाद झाला. सॅमसनने 45 चेंडूत 58 धावांची खेळी केली.

अखेरीस शिवम दुबेने आक्रमक खेळ केला. तो शेवटच्या षटकात 12 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 26 धावा करून धावबाद झाला. अखेर भारताला १६७ धावांपर्यंत पोहचता आले. रिंकु सिंग 9 चेंडूत 11 धावांवर नाबाद राहिला.

झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुधराबनीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या, तर सिकंदर रझा, रिचर्ड नागरावा आणि ब्रँडन मावुता यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT