Zimbabwe all-rounder Sean Williams retires sakal
Cricket

टी-20 वर्ल्डकपपूर्वी दिग्गज दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती! बोर्डाने दिली माहिती

Sean Williams retires : लवकरच टी-20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. पण त्याची सुरुवात होण्यापूर्वीच दिग्गज खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे.

Kiran Mahanavar

Sean Williams retires : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार 1 जूनपासून रंगणार आहे. या मेगा टूर्नामेंटपूर्वी, झिम्बाब्वे क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण सीनियर अष्टपैलू शॉन विल्यम्सने टी-20 फॉरमॅटमधून अचानक निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. 37 वर्षीय विल्यम्सने बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतील 5व्या सामन्यानंतर हा निर्णय घेतला. ज्याची माहिती ही झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने दिली.

झिम्बाब्वे क्रिकेटने सांगितले की, सीन विल्यम्सने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सामना संपल्यानंतर त्याने आपला निर्णय आपल्या सहकाऱ्यांना सांगितला.

शॉन विल्यम्सने टी-20 मध्ये असा विक्रम केला आहे, जो टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि वेस्ट इंडिजचा स्टार सलामीवीर ख्रिस गेल यांनाही आतापर्यंत करता आलेला नाही.

झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू शॉन विल्यम्स हा सर्वात दीर्घ कालावधीसाठी म्हणजेच 17 वर्षे 166 दिवस टी-20 आंतरराष्ट्रीय खेळणारा जगातील दुसरा क्रिकेटपटू आहे. या बाबतीत बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे. ज्याची कारकीर्द दीर्घकाळ चालू राहील.

सीन विल्यम्सने 28 नोव्हेंबर 2006 रोजी बांगलादेशविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 81 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 80 डावांमध्ये 23.48 च्या सरासरीने आणि 126.38 च्या स्ट्राईक रेटने 1691 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 11 अर्धशतके झळकावली. टी-20 क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 66 आहे.

गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 73 डावात 48 यश मिळवले आहे. या काळात त्यांची सरासरी 28.62 होती . 3/15 हे त्याचे गोलंदाजीतील सर्वोत्तम आकडे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

BABAR AZAM: पहिल्या टेस्टमधून बाहेर, पण आता कमबॅकसाठी सज्ज? बाबर आझमच्या फिटनेसवर पाकिस्तान टीम मॅनेजमेंटने दिली मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : नागपुरात काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार

Congress on Caste Census: जातगणना प्रक्रियेला काँग्रेसचा तीव्र विरोध ;खर्गे, राहुल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

SCROLL FOR NEXT