India tour of Zimbabwe Sakal
Cricket

IND vs ZIM: टी20 मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेत पोहचलेल्या टीम इंडियाचं जोरदार स्वागत, पाहा Video

India Tour of Zimbabwe: भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला असून तिथे 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

India Tour of Zimbabwe: आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा भारतीय संघाने जिंकली. या स्पर्धेत अनेक अनुभवी खेळाडू खेळले.

दरम्यान, या स्पर्धेनंतर लगेचच आठवडा भरात झिम्बाब्वे दौरा ठरला असल्याने अनुभवी खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिले आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी शुभमन गिलला भारतीय संघाचे कर्णधार करण्यात आले आहे.

हा युवांचा भरना असलेला भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये पोहोचला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळलेला एकही खेळाडू नाही. टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात राखीव म्हणून निवडले गेलेले खेळाडू रिंकू सिंह, शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद यांना संधी मिळाली आहे.

दरम्यान भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये पोहचल्यानंतर त्यांचं जल्लोषात स्वागत झालं आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदाच भारतीय संघ खेळताना दिसणार आहे.

दरम्यान एकीकडे एक भारतीय संघ झिम्बाब्वेला पोहोचला असताना टी२० वर्ल्ड कप विजेता संघ गुरुवारी भारतात परतणार आहे. झिम्बाब्वेला गेलेल्या भारतीय संघासह व्हीव्हीएस लक्ष्मण प्रभारी प्रशिक्षक म्हणून गेला आहे. राहुल द्रविडचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला आहे. आता लवकरच बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करणार आहे.

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक (टी२० मालिका) (वेळ - भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्या. 4.30 वाजता)

  • 6 जुलै - पहिला टी20 सामना, हरारे

  • 7 जुलै - दुसरा टी20 सामना, हरारे

  • 10 जुलै - तिसरा टी20 सामना, हरारे

  • 13 जुलै - चौथा टी20 सामना, हरारे

  • 14 जुलै - पाचवा टी20 सामना, हरारे

पहिल्या दोन टी20 सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ -

शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकु सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षित राणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT