MS Dhoni - Ziva Dhoni Sakal
Cricket

MS Dhoni: धोनीचं श्वानप्रेम! फादर्स डे निमित्त लेकीनं शेअर केला तो खास Video; एकदा पाहाच

Father's Day: एमएस धोनीची लेक झिवा हिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याचा एक खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Pranali Kodre

MS Dhoni Video: दरवर्षी जून महिन्यातील तिसरा रविवार हा पितृदिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्यानुसार यावर्षी 16 जून रोजी पितृदिन साजरा केला जात आहे. त्याचनिमित्ताने अनेकांनी विविध स्वरुपात आपल्या वडिलांबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त केले आहे.

याचदिवशी भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनीचाही एक खास व्हिडिओ समोर आला आहे.

धोनीची 9 वर्षांची लेक झिवा हिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून 16 जून रोजी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी त्याच्या रांचीमधील घरी त्याच्या पाळीव कुत्र्यांबरोबर वेळ घालवताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये वेगवेगळे क्षणांची झलक दिसत आहे. यावेळी तो आणि झिवाही कुत्र्यांबरोबर खेळताना दिसत आहे, तसेच धोनीची पत्नी साक्षीही कुत्र्यांबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे की 'फॅमिलिया'.

धोनीचे श्वानप्रेम कोणापासूनही लपून राहिलेले नाही. त्याने अनेकदा याबाबत उघडपणे भाष्यही केले आहे. त्याच्या घरी अनेक पाळीव प्राणी असून यात अनेक कुत्रे आहेत. धोनी या कुत्र्यांबरोबर नेहमीच खेळताना दिसतो. त्याने गेल्यावर्षी त्याचा वाढदिवसही त्याच्या पाळीव कुत्र्यांबरोबर साजरा केला होता.

दरम्यान, धोनीची लेक झिवाबद्दल सांगायचे झाले, तर 2015 साली तिचा जन्म झाला होता. तिचे इंस्टाग्रामवर अकाउंट असून ते तिचे आई-वडील म्हणजेच एमएस धोनी आणि साक्षी चालवतात. तिच्या अकाउंटला अडीच लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. काही दिवसांपूर्वीच तिच्या अकाउंटवरून धोनी कुटुंबाचा युरोप ट्रीपचे खास फोटो शेअर करण्यात आले होते.

धोनी सध्या त्याच्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. तो काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2024 स्पर्धेत खेळला होता. यंदाच्या आयपीएलपूर्वी त्याने चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपवले होते. यानंतर हा धोनीचा अखेरचा आयपीएल हंगाम होता, अशी चर्चा आहे. मात्र, अद्याप धोनीने त्याच्या निवृत्तीवर अधिकृत भाष्य केलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT