Ambati Rayudu In Politics esakal
क्रीडा

Ambati Rayudu : आली लहर केला कहर! रायुडूने आठवड्याभरात वायएसआर सोडली, म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

Ambati Rayudu Quit Politics : भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडूने निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश करत आपली दुसरी इनिंग सुरू केली होती. अंबाती रायुडूने 28 डिसेंबरला वायएसआरसीपी पक्षात प्रवेश केला होता. मात्र अवघ्या आठवड्याभरात त्याने ट्विट करून आपण वायएसआरसीपी पक्ष सोडत असल्याची माहिती दिली. सध्या सोशल मीडियावर त्याचे ट्विट व्हायरल होत आहे.

अंबाती रायुडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये राजकीय पिचवर आपली दुसरी इनिंग सुरू केली होती. त्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींची भेट घेतली होती त्याचवेळी तो राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्याने गुंटूरमधून निवडणूक लढवण्यासाठी तयारी देखील सुरू केली होती. त्याने ग्रामीण भागातील लोकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.

त्यानंतर 28 डिसेंबरला अंबाती रायुडूने वायएशआर पक्षात प्रवेश केला. या गोष्टीला काही दिवसही झाले नाही तोपर्यंत आज त्याने पक्ष सोडत असल्याचे ट्विट केले. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'मी सर्वांना सांगू इच्छितो की मी वायएसआर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी राजकारणापासून काही काळ दूर राहणार आहे. मी पुढं काय करणार आहे हे योग्य वेळी कळवण्यात येईल.'

नुकतेच जगनमोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला यांनी त्यांच्या वायएसआर तेलंगण पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले होते. शर्मिला यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने आंध्र प्रदेशातील काँग्रेस पक्षाला बळकटी मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

सोनी BBC अर्थने धर्मेश बरई यांचा ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून गौरव केला

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT