Gautam Gambhir
Gautam Gambhir Sakal
क्रीडा

नकार दिल्याची तिला आजही खंत वाटते; गंभीरनं सांगितला पत्नीचा किस्सा

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने 2011 विश्वचषक (World Cup 2011) स्पर्धेत संघाला जेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. संपूर्ण स्पर्धेत त्याने काही सामन्यात महत्त्वपूर्ण खेळी केल्याचे पाहायला मिळाले.

श्रीलंकेविरुद्धच्या फायनलमध्ये त्याने 97 धावांची खेळी केली. ही खेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च नसली तरी सर्वोत्तम खेळी आहे. शतक हुकले असले तरी त्याच्या खेळीमुळेच वनडेत दुसरा वर्ल्ड कप भारताच्या नावे झाला होता.

मुंबईतील वानखेडेच्या स्टेडियमवर गंभीरच्या खंबीर खेळीचा जयजय कार झाला. प्रेक्षकांनी त्याच्या नावाने एकच जयघोष केला. पण त्यावेळी हे सर्व पाहण्यासाठी त्याची तत्कालीन गर्लफ्रेंड आणि सध्याची पत्नी नताशा जैन स्टेडियमवर नव्हती. तिने मोफत मिळणारे तिकीट नाकारले होते. एका कार्यक्रमामध्ये गंभीरने ती का आली नव्हती यामागची कहाणी सांगितली आहे.

गंभीर म्हणाला की, नताशाला त्यावेळी ती मॅच किती महत्त्वपूर्ण आहे, याचा अंदाज नव्हता. भारतीय संघाने फायनल सामना जिंकल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा झाला. त्यावेळी तिला त्या मॅचचे महत्त्व खूप होते, याची जाणीव झाल्याचे गंभीर म्हणाला.

एका यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीवेळी गंभीर म्हणाला की, "जेव्हा आम्ही मोहालीच्या मैदानात पाकिस्तान विरुद्धची सेमी फायनल जिंकली. ज्यावेळी फायनलसाठी मुंबईला पोहचलो त्यावेळी ही मॅच पाहण्यासाठी येणार का? असे नताशाला विचारले होते. पहिल्यांदा तिने विचार करुन सांगते, असे उत्तर दिले. ही मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे का? ती एक क्रिकेटची आणखी एक मॅच आहे, असे ती म्हणाली. तेवढ्यासाठी कुठे मुंबईला जायचे असे म्हणत तिने भाऊ आणि बहिणीला तिकीट दिले. ते आलेही. आम्ही जिंकल्यानंतर देशात जल्लोष सुरु झाला. त्यावेळी नताशाने एवढा उत्साह कसला? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी आम्ही 21 वर्षांनतर वर्ल्ड कप जिंकल्याचे तिला सांगितले. आजही तिला या गोष्टीची खंत वाटते, असे गंभीरने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT