Shubman Gill Esakal
क्रीडा

Shubman Gill : अखेर समोर आलं? ‘या’ मुलीला डेट करतोय शुभमन गिल

शुभमनचं नाव सारा अली खान आणि सारा तेंडुलकर यांच्याशी जोडलं जात होतं

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटर शुभमन गिल आणि त्याचं रिलेशनशिप स्टेटस जोरदार चर्चेत आहे. शुभमन गिलचं नाव सारा या नावाशी जोडलं जात आहे. पण ती अभिनेत्री सारा अली खान की सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हे कोणालाच माहीत नव्हतं. तर आता शुभमन नक्की कोणाला डेट करतोय याचा पुरावा समोर आला आहे.

व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे शुभमन गिलचं नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरशी जोडलं जातं आहे. शुभमन गिलने त्याच्या पोस्टद्वारे त्यांच्या चाहत्यांना ही हिंट दिली आहे की सारा तेंडुलकरला डेट करतोय.

शुभमन गिलने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो एका रेस्टॉरंटमध्ये बसलेला दिसत आहे. त्याच्या हातात एक कप आहे आणि तर या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ‘What day is it again??’

तर काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकरनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता. विशेष म्हणजे सारा आणि शुभमनने पोस्ट केलेल्या या फोटोंमागील बॅकग्राऊंड अगदी सारखाच आहे. म्हणूनच नेटकरी या दोघांच्या डेटिंगविषयी चर्चा करत आहेत. या दोघांचा फोटो एकाच दिवशी काढलेला आहे, असा अंदाजही नेटकरी वर्तवत आहेत.

तर टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल याचं नाव अभिनेत्री सारा अली खानशी जोडलं गेलं होतं. जेव्हा शुभमनने सेंच्युरी मारली, तेव्हा त्याचे चाहते सारा-सारा म्हणून ओरडू लागले होते. तर ‘दिल दिया गल्ला’ या पंजाबी चॅट शोमध्ये शुभमनने त्यांच्या डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT