suresh raina felicitated with sports icon award by goverment of maldives  Sakal
क्रीडा

मालदीव सरकारसाठी रैना ठरला अनमोल, कारणही तसंच...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली, एएनआय : भारतीय संघाचा माजी अष्टपैलू सुरेश रैनाच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी झालेल्या मेगा लिलावात अनसोल्ड ठरलेल्या रैनाचा मालदीव सरकारनं सन्मानित केले आहे. मालदीव स्पोर्ट्स पुरस्कार 2022 अंतर्गत रैनाला प्रतिष्ठित 'स्पोर्ट्स आयकॉन' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. (cricketer suresh raina felicitated with sports icon award by goverment of maldives)

या पुरस्काराच्या शर्यतीत रियल मॅड्रिडचा माजी खेळाडू रॉबर्टो कार्लोस, जमेकाचा धावपटू असाफा पावेल, श्रीलंकेचा माजी क्रिकेटर सनथ जयसूर्या आणि डच फुटबॉलमधील दिग्गज एडगर डेविड्स सहित 16 आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी करण्यात आली होती.

35 वर्षीय माजी क्रिकेटरला आतापर्यंतच्या कारकिर्दीतील वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगिरीमुळे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बांगलादेशचे युवा आणि क्रीडा मंत्री मोहम्मद जहीर अहसान रसेल यांच्या हस्ते त्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अल-कादी बद्र अब्दुल रहमान, सौदी अरबचे क्रीडा उप मंत्री, मालदीव टेनिस असोसिएशनचे मानद अध्यक्ष अहमद नजीर हे मान्यवर उपस्थित होते.

सुरेश रैना 2011 मध्ये वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. चेन्नई सुपर किंग्ज ( CSK ) फ्रेंचायझींने आयपीएलमध्ये आतापर्यंत चार वेळा जेतेपद पटकावले आहे. चारही वेळेस रैना या संघाचाही सदस्य राहिला आहे. T20 कारकिर्दीत तो 8000 धावांचा टप्पा पार करणारा पहिला खेळाडू आहे. एवढेच नाही तर IPL मध्येही त्याने सर्वाध आधी 5,000 धावांचा पल्ला गाठला होता. चॅम्पियन्स लीग T20 च्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतकाचा विक्रमही त्याच्या नावे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT